विधवा महिलेस आमीष दाखवून अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 8, 2022

विधवा महिलेस आमीष दाखवून अत्याचार.

 विधवा महिलेस आमीष दाखवून अत्याचार.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील रहिवासी असलेल्या एका विधवा महिलेच्या दुबळ्यापणाचा फायदा घेत, या घटनेतील आरोपीकडे ड्रायव्हर असलेल्या इसमाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून, लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार जबरदस्तीने अत्याचार केले. याबाबत पीडितेने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादी नंतर सदरील प्रकार समोर आलेला आहे.याप्रकरणी आरोपी याला पोलिसांनी त्याच्या स्कॉर्पिओ गाडी सह ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,माहे ऑगस्ट 2021 रोजी नमूद महीलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.पिडीतेचा पती, यातील आरोपीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता.साधारण 2017 पासून 2020 पर्यंत आरोपी आणि या कुटुंबाचे संबंध होते. मात्र 2021 मध्ये नमूद महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर माहे ऑक्टोबर 2021 रोजी आरोपी हा त्या विधवा महिलेच्या घरी गेला.तीचा 14 वर्षांचा मुलगा तिच्या आईकडे गेला होता.ती घरी एकटी असल्याने आरोपीने तिला तुझे पती मयत झालेले आहेत आणि माझ्या पत्नीशीही माझं पटत नसल्याने,मी तिला लवकरच घटस्फोट देणार आहे.तिला घटस्फोट दिल्यानंतर मी तूझ्याशी लग्न करील..! असे म्हणून, त्याने त्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली.तिने त्याला नकार दिला. मात्र, तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर आज पर्यंत त्याला वेळोवेळी समक्ष भेटून तसेच फोनवर संपर्क साधून लग्नाबाबत तिने विचारले असता,त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला व जबरदस्तीने अत्याचार केलेबाबत भाऊ आणि आईला तिने सांगितले. तिच्या विधवापणाचा गैरफायदा घेऊन,त्याने तिला तुझे पती मयत झालेले आहेत आणि माझे पत्नीशी पटत नसल्याने तिला घटस्फोट देऊन, तुझ्याशी लग्न करेल. असे लग्नाचे आमिष दाखवून... वारंवार तिच्याशी घरी व गाडीमध्ये शारीरिक संबंध केले आणि आता लग्नाला नकार दिल्याने,त्या विधवा महिलेने त्या जिल्हाध्यक्ष विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार  एका जिम्मेदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर भादवि कलम 376,417 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2)र्(ीं) व 3(2)र्(ींर) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली जाणकार हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment