बिना ‘ओळखपत्र’ रूम दिल्यास कार्यवाही. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 8, 2022

बिना ‘ओळखपत्र’ रूम दिल्यास कार्यवाही.

 बिना ‘ओळखपत्र’ रूम दिल्यास कार्यवाही.

जिल्हा पोलीस अधीक्षकांचा शिर्डीतील हॉटेल चालक मालकांना इशारा.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या साई बाबांच्या ‘शिर्डी’त पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे. शिर्डीतील हॉटेलमध्ये बाहेरच्या राज्यातून आलेल्या भाविकांना निवासासाठी हॉटेल सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे भाविकांच्या नावाखाली गुन्हेगार शिर्डीत आश्रयासाठी येवू लागल्याने नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हॉटेल व्यवसायिक चालक-मालक यांची बैठक घेऊन सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. शिर्डीत कोणत्याही ओळखपत्राशिवाय रूम मिळत असल्याचे माहिती मिळाल्यास कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणाले. रूम देताना ओळखपत्र व रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय रूम दिल्यास 144 सी आर पी एफ कलम तसेच आदेशाप्रमाणे 188 नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शिर्डीतील हॉटेल व्यासायिकांचे धाबे दणाणले आहे. तर शिर्डीतील सुरक्षा आढावा घेत अनेक सूचना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी बैठकीत केल्या आहेत.
अहमदनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी पोलिसांनी हे महत्वाचे उचलल्याने नागरिकांसह हॉटेल व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलीस सतर्क झाले आहेत. यामुळे शिर्डीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या जास्त आहे. या भाविकांवरही आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे. हे भाविक राहण्यासाठी रिसॉर्ट किंवा हॉटेल बुक करतात. यावेळी त्यांची तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्र न पाहता राहण्यासाठी रुम दिल्यास त्या हॉटेल मालकावरही कारवाई करण्यात येणार आहे. शिर्डीत पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यावर शिर्डीच्या सुरक्षेच्या प्रश्नाने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच अनुषंगाने सुरक्षेचा आढावा घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी हॉटेल व्यावसायिक चालक मालक यांची बैठक घेत आदेश दिले आहेत. हॉटेल व्यवसायिकांसह ग्रामस्थांच्या बैठकीत सक्त सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथक, अहमदनगर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी एकत्रित मिळून एक मोठी कारवाई केली. शिर्डीतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राजिंदर असे असून तो पंजाबमधील असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्याला महाराष्ट्र एटीएसने पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.पंजाब पोलिसांच्या गाडीला स्फोटके लावून उडवून देण्याच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. नाशिक एटीएस विभागाचे अधिकारी, अहमदनगर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी एकत्रित मिळून ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment