जिल्हात “स्वच्छता ही सेवा” अभियान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 6, 2022

जिल्हात “स्वच्छता ही सेवा” अभियान.

 15 सप्टें. ते 2 ऑक्टोंबर या काळात जिल्हा परिषदेच्या वतीने.

जिल्हात “स्वच्छता ही सेवा” अभियान.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दरवर्षी प्रमाणे जिल्हयातील सर्व गावात 15 सप्टेंबर ते 2 ओक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने या वर्षी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात गावांची दुश्यमान स्वच्छता ही थीम घेऊन हे अभियान गावागावात राबविण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी दिली.
जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी व आरोग्य संपन्न गावे निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या सुचनेनुसार दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 02 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत स्वच्छता ही सेवा गावामध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहिम राबविण्याबाबतच्या केंद्र शासनाकडून सुचना प्राप्त झालेल्या आहेत.
सदरील कालावधीत खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावांध्ये दृष्यमान स्वच्छता, गावातील कचरा कुंडया व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी (सुका व ओला) वेगळा करण्यासाठी जनजागती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करुन नियोजन करावे, पाणवठयाजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपन एकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्यपरिणामांबददल सभा अयोजित करुन यापुर्वी प्लॅस्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करावी. हागणदारीमुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे, घोषवाक्य लेखन,प्रतिज्ञा घेणे, कचरा न करणे, प्लॅस्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर वत्कृत्व, निबंध रांगोळी, सजावट व देखवा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी गणेश मंडळांना आवाहन करण्यात येत आहे. यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर म्हणाले की, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांनी नियोजन करुन व गावातील सरपंच ग्रामपंचायती सदस्य गावातील सामाजिक संस्था व लोकांनी मोठया प्रमाणात पुढकार घेऊन हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे.असेही आवाहन त्यांनी केले आहे.सदरील अभियानाचे नियोजन प्रकल्प संचालक जल जीवन मिशन सुरेश शिंदे यांनी केले असून तसा पत्रव्यवहार केला असून या कामी सर्व यंत्रणाचा अहवाल घेतला जाणार असल्याचेही सुरेश शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment