दिवसा घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद एक आरोपी फरार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 6, 2022

दिवसा घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद एक आरोपी फरार.

 दिवसा घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद एक आरोपी फरार.

आरोपींकडून 63 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा 4 लाख 87 हजार 500 रु. किं.चे मुद्देमाल जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चिंचोडी पाटील परिसरात दिवसा बंद घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख 1 लाख 30 हजार रुपयांची चोरी करणारा सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ भाजी हबाजी भोसले (रा पिंपरखेड ता आष्टी जि बीड) व त्याचा साक्षीदार मुकेश उग्रसेन उर्फ उग्र्या भोसले हे चोरलेले दागिने विकण्यासाठी निघाले असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंचोडी पाटील मधील एसटी बस स्थानकावर पाठलाग करून प्रवीण भोसले यास ताब्यात घेतले असून त्याचा दुसरा साथीदार मुकेश उग्रसेन मात्र पळून गेला पकडलेल्या सराई आरोपीकडुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 24 ऑगस्ट 2022 कामरगांव (ता. नगर) हे कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेलेले असतांना अनोळखी चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडूनउघडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोख असा 1 लाख 30 हजार रु. किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करुन चोरुन नेला होता, या शामराव इंद्राज आंधळे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुरनं. 589/2023 भादवि कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुन्ह्याचे समातंर तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हयाचा तपास करीत असताना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली, गुन्हा हा आष्टी, (जि. बीड) येथील सराईत गुन्हेगार प्रविण ऊर्फ भाजी हबाजी भोसले (रा. पिंपरखेड, आष्टी, जि. बीड) त्याच्या साथीदारांनी मिळून केलेला आहे. प्रविण भोसले व त्याचे साथीदार हे चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी दुचाकीवर जामखेड ते नगर रोडने अहमदनगरकडे येणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून दोन पंच व पंचनामा करण्याचे साहित्यासह शासकीय वाहनाने चिचोंडी पाटील नगर जामखेड रोडने जात असतांना चिचोंडी पाटील गांवातील एसटी स्टॅण्डवर दोन संशयीत दुचाकी बाजूला लावून थांबलेले दिसले. पथक छापा घालून संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. पथकाने संशयीतांचा पाठलाग करुन एकास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. एक संशयिताने दुचाकी सोडून पळून गेला. त्याचा शोध घेतला परंतु तो पोलिसांना मिळून आला नाही.
ताब्यात घेतलेल्या इसमा त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण ऊर्फ भाजी हबाजी भोसले (रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. त्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने नगर तालुका हद्दीतील चिचोंडी पाटील, मठपिंप्री व कामरगांव परिसरात दिवसा घरफोडी करुन चोरी केले बाबत कबुली दिली. पळून गेलेल्या साथीदारा बाबत विचारपुस करता त्याने त्याचे नाव मुकेश उग्रसेन ऊर्फ उग्रॉ भोसले (रा. साबलखेड, ता. आष्टी, जि.बीड) असे असल्याचे सांगितले, फरार झालेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहोत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि दिनकर मुंडे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, संदीप घोडके, पोना रवि सोनटक्के, भिमराज खर्से, पोकॉ विनोद मासाळकर, योगेश सातपुते व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment