श्री विशाल गणेश मंदिरात महिलांच्या सामुहिक अथर्वशिर्ष पठाणाने परिसर भक्तीमय. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 6, 2022

श्री विशाल गणेश मंदिरात महिलांच्या सामुहिक अथर्वशिर्ष पठाणाने परिसर भक्तीमय.

 श्री विशाल गणेश मंदिरात महिलांच्या सामुहिक अथर्वशिर्ष पठाणाने परिसर भक्तीमय.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त सामुहिक अथर्वशिर्ष पठण व महाआरती करण्यात आली. या अथर्वशिर्ष मध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वेशभुषा, एक ताल-सुरात अथर्वशिर्षने परिसर भक्तीमय झाला होता. यावेळी भक्ती गीते सादर करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात महिलांचा सन्मान केला, त्यानंतर महाआरती करुन प्रसाद वाटपाने सांगता झाली.
यावेळी व्यासपीठावर सौ.संगीता देऊळगांवकर, सौ.शारदा होसिंग, अमृता बेडेकर, ऋतुजा पाठक, स्वप्ना बेडेकर, दिप्ती शुक्रे, स्नेहल झांबरे, मेघा बकरे, श्रद्धा देऊळगांवकर, चैताली जावळे, सोनम गाडळकर आदिंनी अथर्वशिर्ष पठणास प्रारंभ केला. यावेळी रेखा झंवर, आशा पुंड, मिनाक्षी सैंदाणे, वर्षा मारवाडी, लिना पंडा आदि महिलांनी शंखनाद केला. या अथर्वशिर्षाचे नियोजन ऋषीकेश आगरकर, हर्षल फुलारी, गणेश राऊत आदिंनी केले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, गजानन ससाणे, रंगनाथ फुलसौंदर, संजय चाफे, प्रा.माणिकराव विधाते, नितिन पुंड आदिंसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते. यावेळी नाशिक येथील वेदशास्त्री मुकुंदशास्त्री मुळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment