माध्यमिक शिक्षण विभाग अधिक्षकांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 1, 2022

माध्यमिक शिक्षण विभाग अधिक्षकांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी.

 माध्यमिक शिक्षण विभाग अधिक्षकांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माध्यमिक शिक्षण विभाग, नगर येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षक वर्ग-2 सत्यजित मच्छिंद्र हे सहा वर्षापासून येथे कार्यरत आहेत. त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे करुन कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्या चौकशीसाठी उपसंचालक पुणे यांनी दि. 25 जुलै 2022 रोजीच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी (प्रा.) भास्कर पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या सर्व मालमत्तेची व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांना त्वरीत सेवेतून निलंबीत करण्याची मागणी श्री. राजेंद्र शिंदे यांनी शिक्षण उपसंचालक पुणे व मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांचेकडे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सत्यजित मच्छिंद्र शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी व माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांना हाताशी धरुन संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करुन तसेच प्रस्तावासोबत संस्थेने वर्तमान पत्रात दिलेली जाहिरात रिक्त पदांचा तपशील नाहरकत प्रमाणपत्र, रोस्टर आदींची तपासणी न करता शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता देऊन कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. शिक्षक भरती सन 2012 पासून बंदी असतांना सन 2016 ते 2021-22 पर्यंत अनेकांना वैयक्तिक मान्यता देऊन तसेच मागील वर्षाच्या नेमणुका देऊन कोटींचे फरक बील काढून शासनाची फसवणुक केली आहे. संस्थेकडे किंवा शाळेकडून उशिरा प्रस्ताव सादर केल्यानंतरही त्यांच्याकडे त्या नेमणुक काळातील निकालपत्रक, शिक्षक हजेरी ऑडिट रिपोर्ट, पगारपत्रक, संच मान्यता आदी. खात्री न करता मागील वर्षातील मान्यता दिली. तसेच शालेय शिक्षण मंत्रालयातील बनावट आदेशाचा वापर करुन सत्यजित मच्छिंद्र यांनी संगनमताने शिक्षकांच्या अनेक वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत. या सर्व बाबींची चौकशी करून सत्यजित मच्छिंद्र यांना त्वरीत निलंबीत करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment