मनपाच्या नियमाप्रमाणे सेवेमध्ये प्रामाणिक काम करावे ः महापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 1, 2022

मनपाच्या नियमाप्रमाणे सेवेमध्ये प्रामाणिक काम करावे ः महापौर.

 मनपाच्या नियमाप्रमाणे सेवेमध्ये प्रामाणिक काम करावे ः महापौर.

मनपा कर्मचार्‍यांना अनुकंपा तत्वावर  गट ‘ड’ मध्ये नियुक्ती पत्र, महापौरांचे हस्ते कर्मचार्‍यांना प्रदान.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कर्मचार्‍यांचे अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केले होते. त्या प्रस्तावास गती देवून या कर्मचार्‍यांना मनपा सेवेत नियुक्तीचे पत्र देण्यात आले असून कर्मचार्‍यांनी आपल्या मनपाच्या नियमाप्रमाणे सेवेमध्ये प्रामाणिक काम करावे व मनपाचे हित जोपासावे तसेच नियमीत व वेळेत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे. असे आवाहन महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी केले आहे.
यावेळी गट ड मध्ये कु.भक्ती सुनिल बेलेकर, श्री.अमोल दादा चव्हाण, श्री.ओंकार बाळासाहेब कराळे, श्री.ओंकार जालिंदर आमले या कर्मचार्‍यांना अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना अनुकंपा तत्वावर गट ड मध्ये नेमणुक नियुक्ती पत्र 4 कर्मचार्‍यांना मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांचे शुभहस्ते देण्यात आले. यावेळी माजी विरोधीपक्ष नेता मा.श्री.संजय शेंडगे, नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे, श्री.राजेश लयचेट्टी, श्री. राजेंद्र नराल, श्री.किशोर कानडे, श्री. सोनू चौधरी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment