नगर तालुक्यात स्टोन क्रशरची 32.55 लाखांची वीज चोरी उघड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 1, 2022

नगर तालुक्यात स्टोन क्रशरची 32.55 लाखांची वीज चोरी उघड.

 नगर तालुक्यात स्टोन क्रशरची 32.55 लाखांची वीज चोरी उघड.

मीटर जोडणीत छेडछाड; गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील आगडगाव येथील कृष्णा स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या वीजजोडणीची महावितरणच्या भरारी पथकाने तपासणी केली असता वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून गेल्या 2 वर्षात एकूण 2 लाख 21 हजार 328  युनिटसची म्हणजे एकूण 32 लाख 54 हजार 940 रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संदीप बराट (शाखा कार्यालय, कौडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.  नगर तालुक्यातील आगडगाव येथील कृष्णा स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या ठिकाणी थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सदर खडी क्रशरचे मालक दिलीप रंगनाथ गायकवाड हे आहेत. सदर ठिकाणी तपासणीसाठी उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर व कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांच्या सह महावितरणचे भरारी पथक गेले असता रोहीत्रावरील वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या खडी क्रशरच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने यात  गेल्या 2 वर्षात एकूण 2 लाख 21 हजार 328  युनिटसची म्हणजे एकूण 32 लाख 54 हजार 940 रुपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने खडी क्रशरच्या मालकाला नोटीस देऊन वीज चोरीची रक्कम 32 लाख 54 हजार 940 रुपये व तडजोडीची रक्कम 13 लाख 10 हजार अशी एकूण 45 लाख 64 हजार 940 रुपये जमा करण्यास सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत खडी क्रशरच्या मालकाने सदर रक्कम न भरल्याने महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांनी मंगळवारी (दि.30) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी खडी क्रशरचे मालक दिलीप रंगनाथ गायकवाड यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment