बनावट सोने ठेवून घेतले 26 लाख रुपयांचे कर्ज. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 8, 2022

बनावट सोने ठेवून घेतले 26 लाख रुपयांचे कर्ज.

 नगर शहर सहकारी बँकेत बनावट सोनेतारण घोटाळा; 4 जण गजाआड.

बनावट सोने ठेवून घेतले 26 लाख रुपयांचे कर्ज.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर सहकारी बँकेत 26 लाख 63 हजार रुपयांचा बनावट सोनेतारण घोटाळा उघड झाल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर सहकारी बँकेचे मॅनेजर दिनेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून विशाल चिपाडे, ज्ञानेश्वर कुताळ, सुनील आळकुटे, अजय कापाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर शहरातील नावाजलेल्या शहर सहकारी बँकेच्या सोने तारण विभागात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. शहर सहकारी बँकेत खोटे सोने तारण ठेवून कर्ज प्रकरण करून बँकेला फसवल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. खोटे सोने ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेण्याचा हा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अर्जदार अक्षय निकाळजे आणि शहर बँकेचे गोल्ड व्हँल्युअर कपाले यांच्यात मैत्री होती. मैत्री असल्याने अर्जदार यांनी कपाले यांस हात उसने वीस हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानुसार बँकेचे गोल्ड व्हँल्युअर अजय कपाले यांनी अर्जदार यांस वीस हजार दिले मात्र त्या मोबदल्यात तुझ्या नावावर शहर बँकेतून सोने तारण कर्ज करून देतो. तसेच सोने देखील माझेच असेल असे सांगितले होते. त्यानुसार अर्जदार याने गोल्ड व्हँल्युअर असलेल्या मित्राला होकार दिला. त्यानंतर गोल्ड व्हँल्युअरने आपल्या दोन साथीदारांना हाताशी धरून बँकेतून अर्जदाराच्या नावे 6 लाख रुपये कर्ज घेत आपल्या साथीदारामध्ये वाटप करून घेतले होते. या गुन्ह्याचा तपास पीएसआय गजानन इंगळे करत आहेत.
मात्र अहमदनगर शहरातील अर्बन बँकेनंतर शहर सहकारी बँकेतही खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याचा प्रकार झाल्याने सभासदांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर अहमदनगर शहरातील आणखी एका बँकेत असेच प्रकरण झाल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment