मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण बेपत्ता! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 8, 2022

मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण बेपत्ता!

 मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण बेपत्ता!

अपहरण.. घातपात.. की आणखी काही.. संशय वाढला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुस्लिम मुलीच्या घरच्यांचा विरोध असताना विवाह केलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील भिल्ल समाजाचा युवक दीपक बर्डे तरूणाचे अपहरण करण्यात आले असून त्याचा घातपात केल्याचा संशय आहे. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र तरूणाचा अजून काहीही ठावठिकाणा लागलेला नसल्यामुळे दिपकच्या कुटूंबीयांचा संयम सुटत चाललाय. जर लवकर त्याचा तपास लावला नाही आणी दोषीवर कारवाई केली गेली नाही तर तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राहणारा दिपक बर्डे या आदिवासी भिल्ल समाजाच्या तरूणाचे मुस्लिम मुलीशी प्रेम जुळलेले होते. या संबंधाला मुलीच्या घरच्यांचा मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या अपरोक्ष दोघांनी दोन महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली आणी आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. मुलीच्या घरच्यांनी दिपकला मारहाण आणी दमदाटी करत मुलीला परत घरी नेले होते. आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचे कळल्यानंतर 30 ऑगस्टला दिपकने घरच्यांना आपल्या मित्रांसोबत नोकरी शोधायला पुण्याला चाललो असल्याचे सांगत पुणे गाठले. पत्नीला भेटण्याच्या आतच दिपकला मुलीच्या मामाने गाठले आणि त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केले असल्याचे दिपकच्या सोबत असलेला मित्र सांगतोय.
मुलीच्या मामाने भोकर गावात राहणार्‍या मुलीच्या पालकांच्या ताब्यात दिपकला दिले आणी त्याचा घातपात केल्याचा गुन्हा दिपकच्या वडीलांनी श्रीरामपूर तालूका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी मजनू बबन शखेख, इमरान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित बबन शेख यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आमचा मुलगा कुठे आहे? त्याचा शोध पोलीस कधी घेणार असा सवाल दिपकच्या वडीलांनी उपस्थित केला. माझ्या मुलाला या लोकांची खुप भिती वाटत होती. मात्र मी रात्री जावून परत येईल असं सांगून घरातून बाहेर पडलेला माझा मुलगा अजून परतला नाही. या लोकांना काय तलवारी काढण्याचा परवाना दिला गेलाय का? आमचा एकुलता एक मुलगा होता तो कुठं गेलाय त्याचं काय झालंय या विचाराने त्याची आई कासाविस झाली आहे. हिंदूची मुलगी जर तुम्ही नेली तर तुमच्या धर्माला योग्य आणी हिंदू मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न केलं तर ते गैर कसं? चुक काय एकट्या आमच्या मुलाने केली होती का? मुलगीही त्यात सामील होती. जर आरोपी पकडले गेले तर आमचा मुलगा का सापडत नाही? त्याचा या लोकांनी घातपात केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आठ दिवस ऊलटून गेले आहे मात्र दिपकचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने लागलेला नाही.

No comments:

Post a Comment