सोनई पोलिसांकडुन सर्वसामान्य नागरिकांना त्रास. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 15, 2022

सोनई पोलिसांकडुन सर्वसामान्य नागरिकांना त्रास.

 सोनई पोलिसांकडुन सर्वसामान्य नागरिकांना त्रास.

घोडेगाव :- सोनई पोलिसांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आत्ताच आलेले सोनई पोलीस स्टेशनचे A.P.I. यांच्या सांगण्यावरून निरअपधार  मुलांना गुन्ह्याशी काही संबंध नसताना घरी जाऊन हाणमार करून ,तसेच चौकशीला घेऊन आले असता, खोट्या केसेस दाखल करण्याची दमबाजी केली. तसेच रवी आल्हाट (सामाजिक कार्यकर्ते )तसेच संघटनेचे पदाधिकारी यांना हीन व दुय्यम वागणूकदिली गेली.  रवीभाऊनी व  पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. घोडेगाव परिसरातील बीट कर्मचारी यांना साहेबांच्या आशीर्वादाने लाईनच्या गाड्या वाल्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. घोडेगाव कांदा मार्केट परिसर या ठिकाणी  लहान गाडी कांदा-100 रुपये व मोठी गाडी प्रत्येकी-200रुपये इतके पैसे घोडेगाव कांदा मार्केट समोर पोलीस कर्मचारी पैसे गोळा करताना दिसतात. याचा त्रास कांदा घेऊन आलेल्या नागरिकांना सहन करावा लागतो. तसेच येत्या काळात हे सर्व बंद झाले नाही तर भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने सोनई पोलीस स्टेशनवर मोर्चा काढू असा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नेवासा तालुका अध्यक्ष रवीभाऊ आल्हाट यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here