मालमत्ता करापोटी थकलेले 210 कोटी कसे वसूल करणार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 1, 2022

मालमत्ता करापोटी थकलेले 210 कोटी कसे वसूल करणार?

 मालमत्ता करापोटी थकलेले 210 कोटी कसे वसूल करणार?

महापालिकेकडून फक्त 18 कोटींचीच थकबाकी वसुली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील मालमत्ताधारकाकडे मालमत्ता करापोटी थकलेल्या 229 कोटी रुपयांपैकी महानगरपालिकेच्या तिजोरीत 18 कोटी 56 लाख रुपयांचा थकीत कर जमा झाला आहे. शंभर टक्के शास्तीमाफी देऊनही मालमत्ताधारक थकबाकी भरण्यास पुढे आले नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या पदरी निराशाच पडली आहे. मालमत्ताकरापोटी थकलेले 210 कोटी रुपये वसूल कसे करायचे? हा यक्ष प्रश्न सध्या महापालिका प्रशासन आणि पदाधिकार्‍यांसमोर निर्माण झाला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीनंतर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शंभर टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत कसेबसे 18 कोटी 56 लाख रुपये जमा झाले असले, तरी उर्वरित 210 कोटी रुपये अद्याप थकीत असून ते कसे वसूल करावे असा प्रश्न मनपा प्रशासनासमोर उभा आहे.
शहरातील 76 हजार 912 थकबाकीदारांनी महापालिकेचा सुमारे 229 कोटी रुपयांचा मालमत्ताकर थकवला. जास्तीत जास्त थकबाकी वसूल व्हावी, या उद्देशाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शंभर टक्के शास्ती माफ करण्याचे धाडसी निर्णय घेतला. ही सवलत 26 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीसाठीच होती. मात्र, सवलतीच्या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत केवळ 18 कोटी 56 लाख रुपयांचीच थकबाकी जमा झाली. काही मोठ्या थकबाकीदारांनी या सवलतीचा फायदा घेतला असला, तरी इतर थकबाकीदारांनी त्याकडे पाठ फिरवली. वेळोवेळी आवाहन केले, काही ठिकाणी जप्तीची कारवाईदेखील केली. लोकन्यायालयाच्या माध्यमातून नोटिसा पाठवल्या, तरी थकबाकी भरण्यास मालमत्ताधारक पुढे आले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित रक्कम जमा झाली  नाही. एकीकडे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो, तर दुसरीकडे तिजोरीत खरखराट त्यामुळे महापालिका प्रशासन कोंडीत सापडले मालमत्ता कर वगळता महापालिकेकडे उत्पन्नाचे कोणत्याही साधन नाहीत्यामुळे शास्तीमाफीची संपताच महापालिका सवलत प्रशासन थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई प्रभावीपणे राबविणार आहे.
शंभर टक्के शास्तीमाफीची सवलत देऊन थकबाकीदारांना दिलासा दिला, परंतु अपेक्षित थकबाकी वसूल झाली नाही. त्यामुळे आम्ही आता मालमत्ताजप्तीची कारवाई करणार आहोत. शास्तीमाफीची सवलत बुधवारपर्यंतच होती असे उपाआयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here