गणेश उत्सवानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनकडुन तयारी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, August 28, 2022

गणेश उत्सवानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनकडुन तयारी.

 गणेश उत्सवानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनकडुन तयारी.

खर्डा चौकात घेतली दंगा नियंत्रण योजनेची डमी तालीम


जामखेड :
आगामी सण उत्सव अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनकडुन तयारी म्हणुन दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम व रूट मार्च घेण्यात आला.
जामखेड पोलीस स्टेशन येथे फोन आला की, शहरातील खर्डा चौकात काही टारगट मुलांचा जमाव जमलेला असुन त्यांचेत वाद सुरू आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवुन मोठा वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही तात्काळ पोलीस पाठवा. असा फोन आल्याबरोबरच ठाणे अंमलदार यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळवली असता. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमधील उपलब्ध असलेला पोलीस स्टाफ घेवुन खर्डा चौक येथे पोहोचले. त्यावेळी तेथे जमलेल्या किंवा आजुबाजुला जमलेल्या लोकांना पोलीस इतक्या गडबडीत  कोठे चालले आहेत. याची उत्सुकता लागली. त्यावेळी खर्डा चौकात पोहोचल्यावर कळाले. की कुठेही काही झाले नाही. तर ही आगामी होणाऱ्या गणेश उत्सव निमीत्त् जामखेड पोलीस स्टेशनची दंगा नियंत्रण योजना व मॉब ड्रिलची रंगीत तालीम सूरू आहे.
सदर प्रात्यक्षिक करते वेळी उद्भवलेल्या प्रसंगाला तात्काळ सामोरे जाणेसाठी  २ पोलीस अधिकारी व २५ पोलीस अंमलदार व ६ होमगार्ड तात्काळ उपलब्ध झाले होते. त्यानंतर तेथेच मॉब डिस्पोझलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जमाव विसर्जनाचे प्रात्यक्षिक पोलीस हेडकॉन्टेबल रमेश फुलमाळी  यांनी पध्दतशीरपणे करून दाखवले. हे प्रात्यक्षिक करते वेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, २५ पोलीस अंमलदार व ६ होमगार्ड उपस्थित होते, मॉब डिस्पोजल प्रात्यक्षिक करतेवेळी डमी राऊंड फायर करण्यात आला आहे. तसेच सौम्य लाठीमार ही करण्याचा सराव करण्यात आला आहे.
अशी एखादी घटना घडले तर तात्काळ पोलीसांचा प्रतिसाद मिळण्यासाठी तसेच येणाऱ्या अडचणी जाणुन घेण्यासाठी दंगा काबु योजना व मॉब ड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या प्रात्यक्षिकाला सर्वांचा चांगला प्रतिसाद तात्काळ मिळाला असुन तसेच इतर अधिकारी यांचीही मदत लवकरात लवकर मिळाली आहे. 
यावरून दंगा काबु योजना राबविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भविष्यात येथे पोलीस संख्याबळाची आवश्यकता भासत आहे.

No comments:

Post a Comment