जामखेड तालुक्यामध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, September 4, 2022

जामखेड तालुक्यामध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन.

 जामखेड तालुक्यामध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन.

मा.सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या हस्ते गणपतीची आरती.

शालेय जीवनात  शिकत असताना सर्वधर्म समभावाची शिकवण - मा.सरपंच गफ्फारभाई पठाण


जामखेड -
जामखेड शहरातील नगर रोड येथील मोरया ग्राफीक्स युवा मंच तसेच पिंपरखेड येथील धर्मयोद्धा युवा मंच च्या वतीने गणपतीची आरतीसाठी आज रोजी पाटोदा गरडाचे कर्तव्यदक्ष माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांना निमंत्रित करण्यात आले होते.

गफ्फारभाई पठाण एक मुस्लिम समाजाचे असून,पाटोदा गरडाचे कर्तव्यदक्ष माजी सरपंच गफ्फारभाई पठाण  आज रोजी गणरायाची आरती त्यांच्या हस्ते पार पडली. जामखेड तालुक्यामध्ये प्रथमच हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडले. 

याबाबत आपली भावना व्यक्त करताना गफ्फारभाई पठाण असे म्हणाले की, माझ्यासाठी लहानपणापासून गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण राहिला आहे. धर्माने मुस्लिम असलो, तरी शालेय जीवनात  शिकत असताना सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. 

आज गणेशोत्सवाच्या दिवशी बाप्पाची आरती करण्याचा मान मिळाला ,हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. मोरया ग्राफिक्स युवा मंच जामखेड अध्यक्ष मंगेश काकडे उपाध्यक्ष कृष्ण चव्हाण,धर्मयोद्धा युवा मंच पिंपरखेड..  अध्यक्ष आबासाहेब ढवळे उपाध्यक्ष -अरुण ढवळे सचिव देविदास लाढाणे सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. मोठ्या भक्ती भावाने गणरायाची आरती करण्यात आली.जात,धर्म,पंत या पलीकडे जावून माणूस म्हणून तसेच हिंदू - मुस्लिम ऐैक्याचे  दर्शन घडवून आणले.

No comments:

Post a Comment