जामखेड येथे जमीर भाई बारुद यांचा शासकीय विश्रामगृह येथे कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, September 4, 2022

जामखेड येथे जमीर भाई बारुद यांचा शासकीय विश्रामगृह येथे कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा.

 जामखेड येथे जमीर भाई बारुद यांचा शासकीय विश्रामगृह येथे कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा.

जामखेड मध्ये पडले कॉंग्रेस पक्षाला खिंडार.


जामखेड -
आय कॉंग्रेसपक्षाच्या शहर अध्यक्षपदी आसताना मला विश्वासात घेऊन पदावरून हटवायला पाहीजे होते. पण आता काही दिवसांपुर्वी पक्षात आलेल्या कान फुके व चमकोगीरी करणार्‍या एकुण मला शहर अध्यक्ष पदावरून हटवले त्यामुळे मी कॉंग्रेस पक्ष्याच्या पक्षाचा राजीनामा देत आहे आसे मत कॉंग्रेस चे नेते जमीरभाई सय्यद यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
कॉंग्रेस पक्षात गेल्या २२ वर्षांपासून आसलेले व बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक सय्यद जमीरभाई यांनी अत्तापर्यंन्त कॉंग्रेस पक्षाचे सुरवातीला युवक काँग्रेस शहर अध्यक्ष, सेवा दल कॉंग्रेस, अल्पसंख्याक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष, आय कॉंग्रेस चे शहराध्यक्ष तसेच कर्जत जामखेड सोशल मिडीया प्रमुख आसे आनेक पदांवर काम केले आहे.
गेल्या २००० सालापासून मी कॉंग्रेस पक्षात एकनिष्ठ होतो पण मी शहराध्यक्ष आसताना मला विचारुन या पदारुन हटवायला पाहीजे होते. पण आता कुठे काही दिवसांपुर्वीच पक्षात आलेल्या कानफुक्यांचे व चमकोगीरी करणार्‍यांचे एकुण मला कॉंग्रेस च्या शहरअध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. त्या मुळे माझ्या सह कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. तसेच मला पदावरून हटवण्या आगोदर माझी वरीष्ठांनी साधी चौकशी देखील केली नाही.
जिल्हा कॉंग्रेस कमीटी मध्ये आसणार्‍या व ज्ञान पाझरणाऱ्या एका नेत्याने संपूर्ण जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला वाफेवर ठेऊन पक्षाचे वाटोळे केले आहे आसा आरोप देखील जमीरभाई सय्यद यांनी जिल्ह्यातील एका कॉंग्रेस कमिटीच्या नेत्यांवर नाव न घेता केला आहे. गेल्या बावीस वर्षात मोठा मुस्लिम समाज माझ्या सोबत आसुन अत्तापर्यंन्त ७ हजार मुस्लिम मतदारांचे माझ्या कडुन फक्त वोटबॉंक म्हणून वापर केला आहे. त्यामुळे मझी पक्षात मोठी घुसमट होत आहे त्यामुळे मी कॉग्रेस पक्षाच् राजीनामा देत आहे. तसेच सध्या लगेच कुठल्या पक्षात प्रवेश करणार नसुन मित्र परीवार व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन पुढील रणनीती ठरविण्यात येणार आसल्याची माहिती जमीरभाई सय्यद यांनी बोलताना पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here