न्यु महाराष्ट्र बेकरी शाखा नं. तीन चे उदघाटन सोहळा संपन्न - अमित शेठ गंभीरे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 3, 2022

न्यु महाराष्ट्र बेकरी शाखा नं. तीन चे उदघाटन सोहळा संपन्न - अमित शेठ गंभीरे.

 न्यु महाराष्ट्र बेकरी शाखा नं. तीन चे उदघाटन सोहळा संपन्न - अमित शेठ गंभीरे.


जामखेड - 
गेल्या ३५ वर्षापासून गंभीर परीवार बेकरी व्यवसायामध्ये सेवा देत आहे. सतसंगाद्वारे देखील ते सामाजिक व अध्यात्मिक काम करत आहेत. व्यावसाया बरोबरच गंभीर कुटुंबीय हे समाज्यात सामाजिक नाळ जोडण्याचे काम करत आहे. आसे मत निरंकारी महात्मा रमेश खूपचंदान यांनी न्यु महाराष्ट्र बेकर्स या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.  
निरंकारी महात्मा रमेश खूपचंदान आणि अमित गंभीर यांच्या मातोश्री उषाजी गंभीर यांच्या हस्ते नुकतेच न्यु महाराष्ट्र बेकर्स या शाखा नं तीन या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. 
व्यवसाय कसा करावा, आणि ग्राहकांना सेवा कशी द्यावी याचे उत्तम उदाहरण म्हणून, गंभीर बंधू आणि कुटूंबियांकडे पाहत आलो आहोत, त्यांची तिसरी पिढी आज जामखेड करांच्या सेवेत, न्यु महाराष्ट्र बेकर्स च्या नावाने सेवा देत आहे, एक चांगले व्यावसायिक म्हणून गंभीर कुटुंबीय पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेतच पण या व्यवसाया बरोबर सामाजिक नाळ जपत, स्तस्तंग द्वारे त्यांच्या महात्म्याद्वारे केले जाणारे स्वच्छतेचे कार्यही उल्लेखनीय आहे आसे मत दुर्गा मोबाईल चे संचालक सुनिल जगताप यांनी नविन दालनाच्या भेटी दरम्यान केले.
गेल्या ३५ वर्षापासून बेकरी व्यवसायामध्ये आम्ही सेवा देत आहोत आणि अजून उत्तमरीत्या ग्राहकांना सेवा देता यावी आणि नवीन नवीन वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी या नवीनरीत्या या दालनाची तिसरी शाखा बीड कॉर्नर जवळ सुरू करण्यात आली आहे आसे मत दालनाचे मालक अमित गंभीर यांनी व्यक्त केले आहे. 
यावेळी जामखेड शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ह भ प हरिभाऊ काळे महाराज तेलंगशी ह भ प उत्तम महाराज वरात साकत ह भ प राजाभाऊ मेत्रे जामखेड यांनी उपस्थित राहुन आशिर्वाद दिले.

No comments:

Post a Comment