7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 2, 2022

7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा गजाआड.

 खाद्यपदार्थ देवून.. ओळख वाढवून.. 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा गजाआड. 

 लहान मुलांना खाण्याचे अमीष दाखवून जवळीक वाढविणार्‍यांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पाणीपुरी, चॉकलेट, चिप्स इत्यादी खाण्याचे पदार्थ देत ओळख वाढवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार, बलात्कार करणार्‍या युसुफ हमीद कुरेशी (वय 34 वर्ष सध्या रा काटवन खंडोबा अहमदनगर) या नराधमास काटवन  खंडोबा रोडने पळून जात असताना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले असून नागरीकांनी अनोळखी इसमांकडुन आपल्या लहान मुलांना खाण्याचे अमीष दाखवुन जवळीक निर्माण करण्यार्‍या कडुन सावधान रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी केले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास हा पोसई मनोज महाजन हे करीत आहेत.
1 सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येते फिर्याद दाखल झाली की, फिर्यादी महिला ह्या अहमदनगर शहरात मोलमजुरीचे काम करत असुन तीची पिडीत मुलगी ही वय 7 वर्षाची आहे, दिनांक 31 ऑगस्ट रोजी, फिर्यादी ह्या कामास गेल्या असताना त्यांची मुलीस आरोपी याने त्याचे दुचाकी गाडीवर बसवुन तिला त्याचे कामाचे ठिकाणी नेऊन तिचेवर अनैसर्गिक अत्याचार करुन बलात्कार केला या हकिगती वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे सह बाललैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 3, 4, 7, 8 प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  अनिल कातकडे व कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  संपतराव शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे दोन पथके तयार करुन सदर आरोपी हा गुन्हा करुन पळुन जाणेचे तयारीत असल्याबाबत  संपत शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदरचे दोन पथके हे रेल्वे स्टेशन, बसस्थानक व पोलीस स्टेशन हददीत शोध घेणेबाबत आदेश दिला. त्यानुसार सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा आयुर्वेदिक कॉलेज ते काटवन खंडोबा रोडने नगर शहर सोडुन जात असताना गुन्हे शोध पथकाने त्यास खबरीवरुन ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव याबाबत चौकशी केली असता त्यांने त्याचे खोटे नाव सांगुन पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला परंतु सदर आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्यांने त्यांचे नाव युसुफ हमीद कुरेशी वय - 34 वर्षे सध्या रा. काटवण खंडोबा, अहमदनगर मुळ रा. लासुरणे ता. बारामती जि. पुणे असे सांगितले. सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने कबुल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोसई मनोज कचरे, पोसई मनोज महाजन, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोहेकॉ शरद गायकवाड, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सागर पालवे, पोकाँ दिपक रोहकले, पोकों सुजय हिवाळे, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ संदिप थोरात पोकाँ सोमनाथ राउत, पोकों तान्हाजी पवार पोकों याकुब सय्यद यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment