निर्बंधमुक्त गणेशउत्सव साजरा करताना काळजी घ्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

निर्बंधमुक्त गणेशउत्सव साजरा करताना काळजी घ्या.

 निर्बंधमुक्त गणेशउत्सव साजरा करताना काळजी घ्या.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरींचे गणेश मंडळांना आवाहन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज तोफखाना पोलीस ठाण्यात घेण्यात आली. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी गणेशोउत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी काही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी,विद्युत कंपनीकडून अधिकृत तात्परती विज जोडणी करावी,आक्षेपार्ह घोषवाक्ये,आणि देखावा करताना कोणाची भावना दुखवणार नाही याची मंडळांनी दक्षता घ्यावी,मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी राहदरीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी,ध्वनीक्षेपक वापरावरील निबंधाचे अनुषंगाने प्रदूषण नियंत्रणास न्यायालयाकडील निर्देशाचे तंतोतंत पालन करावे,देखाया पाहण्यासाठी येणार्‍या महिलांसाठी स्वातंत्र यंत्रणा उभारण्यात यावी स्वयंसेवक नेमावे, गणेश स्थापनेमुळे इतर धर्मीयांचे धार्मीक स्थळास कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नही याची दक्षता घ्यावी, मिरवणुकीत वापरण्यात येणारी वाहन सुस्थितीत असल्या बाबत अनादर आरटीओ कडून प्रमाणपत्र घ्याव, स्थापना मिरवणुक/विसर्जन मिरवणूक काढणार असल्याचे त्यांचे व्हिडीओ शूटिंग करावे गरज भासल्यास पोलीसांना दयावी. कोणत्याही प्रकारच्या बॅग पिशव्या मंडपात आणण्यासाठी प्रतिबंध करावा, काही संशयीत चिज वस्तु आढळल्यास पोलिसांना कळवावे शक्यतो अशा वस्तु हाताळू नये, श्री गणेश प्रतिष्ठानेचा मंडप भक्कम असाव, मंडळान सर्व एरिया कव्हर होईल अश्या प्रकारे सि.सि.टि.व्ही लावावेत, विना परवाना वर्गणी गोळा करु नये तसेच वर्गणी काही प्रकार असे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, मूर्ती साठी 24 तास एक मंडपात उपस्थित असावा मंडपाच्या आसपास वादग्रस्त बोर्ड लावण्यात अशा प्रकारच्या विविध सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या तसेच ज्या कार्यकर्त्यांच्या काही शंका असल्यास त्यांचे शंका निरसन करण्यात आल्या यावेळी सहह्याक पोलीस निरीक्षक जे.सी. मुजावर, पीएसआय समाधान सोळंके, गोपनीय शाखेचे पोलीस नाईक तन्वीर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय गव्हाणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment