अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर छापा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर छापा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त.

 अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर छापा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त.

डीवायएसपी मिटके यांच्या पथकाची कामगिरी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर - औरंगाबाद  रोड वर वडाळा बहिरोबा शिवारातील हॉटेल साई सबुरीचे पाठीमागे अवैध गॅस रिफिलिंग सेंटर मध्ये घरगूती गॅस मधून चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या समवेत पुरवठा विभागातील कर्मचारी आणि पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकुन एकूण नऊ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेच्या हकीकत अशी की, नगर-औरंगाबाद रोडवरील वडाळा बहिरोबा शिवारातील हॉटेल साई सबुरीच्या मागील बाजुस असलेल्या अवैध्य गॅस रिफीलिंगच्या सेंटरवर छापा टाकून 5,00,000 रू कि चा . एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच 16 सीसी 2488, 2,08,000 रू.कि च्या भारत गँसच्या अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल मोकळ्या 87 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या, 12,000रू कि.च्या नोझलला लावलेल्या इंडियन गँसच्या कमर्शिअल मोकळ्या 5 गँस सिलेन्डर 19.5 किलो क्षमतेच्या,2500 रू कि.चा एक एचपी कंपनीची घरघुती गँस सिलेन्डर 14.5किलो क्षमतेचा अंदाजे 5किलो गँस असलेला, 1,32,000रू किमतीचे टेम्पोमध्ये भरलेल्या भारत गँसच्या अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल भरलेले 30 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे ,22,000 रू.कि चे टेम्पोमध्ये भरलेले इंडियन गँसचे अर्धवट निळ्या रंगाचे कमर्शिअल 05 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे असा एकूण सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानुसार आरोपी विरुद्ध पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 379,285,34 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3,7 सह एलपीजी पुरवठा वितरन आणि नियमन आदेश 2000 चे कलम 3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक. मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली संदीप मिटके, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पुरवठा अधिकारी रुपाली मोडसे, एपीआय रामचंद्र करपे, एएसआय राजेंद्र आरोळे, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळवे, रमेश लबडे, संतोष वाघ,पोकॉ. नितीन शिरसाठ आदींनी केली.

No comments:

Post a Comment