गणेशोत्सवासाठी नगर शहरात मंडळाकडून परवानगीसाठी अल्प प्रतिसाद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

गणेशोत्सवासाठी नगर शहरात मंडळाकडून परवानगीसाठी अल्प प्रतिसाद.

 गणेशोत्सवासाठी नगर शहरात मंडळाकडून परवानगीसाठी अल्प प्रतिसाद.

आतापर्यंत फक्त 50 ते 55 मंडळांनी घेतली परवानगी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनामुळे सर्वच सण उत्सवावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे सण उत्सव नियम व अटींचे पालन करून साजरे करण्यात आले. यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्याने अबाल वृद्धांपासूनसर्वच जण गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. 31 ऑगस्ट रोजी घरोघरी लाडक्या गणेशाचे आगमन होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले आहेत. महामारी च्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर सार्वजनिक गणोशोत्सव मंडप परवानगीसाठी उभारलेल्या कक्षातून 50 ते 55 मंडळांना चोवीस तासांत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांची परवानगी त्यांच्याजवळ असणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव काळात मनपाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन न केल्यास संबंधित गणेश मंडळाचे अध्यक्ष त्यास जबाबदार राहतील, असे मनपातर्फे सांगण्यात आले. तसेच परवानगी पेक्षा जास्त मंडप उभारणी, ध्वनीप्रदूषण व जाहिरात बाजी करणे मनपाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी तहसीलदारांच्या अधिपत्याखाली पथकाची नेमणूक केली आहे.
गणेशोत्सवात सर्वत्र लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रभाग समिती कार्यालय अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. मंडळासाठी मनपाने जारी केलेले नियम पुढीलप्रमाणे  आहेत. परवानगी पत्र मंडपाच्या दर्शनी भागात लावावे, परवानगी पेक्षा जास्तीचा मंडप उभारू नये, विद्रुपीकरण होईल असे फलक लावू नये -मंडपासमोर गर्दी होऊन नये याची दक्षता घ्यावी, मनपाच्या नियम व अटीचे पालन करावे - जाहिरातबाजी करणारे फ्लेक्स लावू नये -ध्वनी प्रदूषणाच्या नियमाचे पालन करावे -मंडप उभारणीसाठी रस्ता खोदू नये, अति आवश्यक सेवेसाठी मंडपाजवळ जागा ठेवावी, अनधिकृत मंडप उभारू नये -नियमांचे उल्लंघनास मंडळ अध्यक्ष जबाबदार. रोहिदास सातपुते अतिक्रमण विभाग प्रमुख यांनी गणेश मंडळांनी मनपाच्या सर्व नियम व अटींचे पालन करावे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावी. अन्यथा अतिक्रमण विभाग दंडात्मक कारवाई करून अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार असे सांगितले. तसेच गणेश मंडळांना परवानगी देण्याचे काम शनिवार व रविवार ही चालू राहील त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सर्व गणेश मंडळांना लवकरात लवकर परवानगी घेण्याचे आवाहनही सातपुते यांनी केले.

No comments:

Post a Comment