अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी.

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी हिरामण संभा तिखोले वय 52 रा.वडगाव सावताळ ता.पारनेर यास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांच्या न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, अल्पवयीन मुलगी तिच्या आजोबांकडे वडगाव सावताळ येथे राहत होती. पीडिता ही शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असता, त्या ठिकाणी आरोपी हिरामण तिखोले हा आला व त्याने पीडितेवर अत्याचार केला होता. त्यानंतर ’कोणास काही सांगायचे नाही’, अशी धमकीआरोपीने पीडितेला दिली होती. या घटनेनंतर आरोपीने या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिली. तिच्या पोटात दुखत असल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी ती अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने दि. 18 जानेवारी 2021 रोजी पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात वर्ग होऊन तपासी अंमलदार प्रमोद वाघ यांनी पुढील तपास करून, आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात एकूण 8 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष वडीएनए अहवाल ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले. तसेच, पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार विलास साठे व एल.पी.सी. धागोडे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment