19 जुगार्‍यांना 28 हजारांच्या मुद्देमालासह अटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

19 जुगार्‍यांना 28 हजारांच्या मुद्देमालासह अटक.

 19 जुगार्‍यांना 28 हजारांच्या मुद्देमालासह अटक.

शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडेंच्या पथकाची कारवाही.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोठला भागातील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 19 जुगार्‍यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख असा 27 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिस उपनिरीक्षक शीतल मुगडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दिलीप कानडे, दत्ता मोतीराम भिंगारे, किरण भगतराम बहुगुणा, सद्दाम गफार शेख, शाहरूख इकबाल पठाण (सर्व रा. कोठला), शेख सिकंदर अहमद, दीपक बाळू वाघमारे (दोघे रा. रामवाडी), अकबर अली कमरअली इराणी (रा. झेंडीगेट), अतुल संजय शिंदे (रा. सिद्धार्थ नगर), खलील हसन शेख, शहाबाज पिरमोहमद शेख, शेख नसीर अन्सार (रा. भिंगार), शेख नवाज कलाम (रा. लालटाकी), शेख रियाज रशीद, अर्षद आयुब शेख (रा. मुकुंदनगर), नंदु रूपचंद उल्हारे (रा. काटवन खंडोबा), जावेद पिरमोहमद सय्यद (रा. फकीरवाडा), सुलतानरशीद शेख (रा. सारसनगर), अनिल सर्जेराव चव्हाण (रा. मंगलगेट) अशाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगारचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक शीतल मुगडे, पोलिस अंमलदार आर.एस. वराट, भानुदास खेडकर, राहुल द्वारके आदींच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment