गुहाटी राजकारणाचे बैल पोळ्यावर ही सावट; बैलाच्या पाठीवर राजकीय कमेंट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

गुहाटी राजकारणाचे बैल पोळ्यावर ही सावट; बैलाच्या पाठीवर राजकीय कमेंट.

 गुहाटी राजकारणाचे बैल पोळ्यावर ही सावट; बैलाच्या पाठीवर राजकीय कमेंट.

पन्नास खोके एकदम ओके, गुहाटीच्या बोक्याला ‘ईडी’चा धाक..नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील सत्तांतरानंतर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक व सत्ताधार्‍यांनी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत घोषणांनी विधानसभा पायर्‍यांवर घोषणा दिल्या. 50 खोके एकदम ओके. विरोधी पक्षाच्या घोषणेचं सावट काल झालेल्या बैलपोळ्यात बैल सजवितानाही दिसून आलं बैलपोळ्या निमित्त बैल सजविताना “गोहाटीच्या बोक्यांना ईडीचा धाक, मांजर झाले हो उद्धवचे वाघ” अशा राजकीय कमेंट बैलावर लिहिण्यात आल्या आहेत.
पोळा हा सण शेतकरी, कष्टकर्‍यांचा सण म्हणून ओळखला जातो. शेतशिवारात राबणार्‍या सर्जा राजाच्या जोडीच्या उत्सवाचा हा सण आहे. बैल रंगवतात पण यंदा त्यात राजकीय घडामोडीच्या आणि शेतकर्‍यांच्या वेदना मांडणार्‍या सजावटी केल्या होत्या. 50 खोके एकदम ओके या घोषणावरून विधिमंडळाच्या पायर्‍यावर गदारोळ झाला. आता ग्रामीण भागातील पोळा सणाला खोक्यांच्या राजकीय रंग सजला आहे. बैलाच पाठीवर वेगवेगळ्या राजकीय कमेंट सजवण्यात आल्या होत्या.खोके रे खोके... पन्नास खोके, गोहाटी गोव्यावरून धावत आले हो बोके...... त्या बोक्याले, ईडीचा धाक ..... मांजर झाले हो, उद्धवचे वाघ.....  बाळासाहेब तुमच्या जिगरी दोस्त पवार साहेब असेपर्यंत शिवधनुष्य खाली पडणार नाही..... एक नमन गौरा पार्वती हरबोला हर हर महादेव.....
शेतकर्‍यांच्या वेदना मांडणार्‍या सजावटीनी त्यात भर घातली आहे. गुवाहटीच्या राजकारणाचे पडसाद या झडत्यात उमटले आहे. ओल्या दुष्काळाचे चित्र स्पष्ट करणार्‍या काही सजावटी ही यावर्षीच्या पोळा उत्सवात लक्षवेधक ठरल्या आहेत.शेतकरी राजा, त्यांची व्यथा आणि बेजार झालेले शेतशिवार, शेतशिवाराच्या नावावर रंगणारा कलगीतुरा सजावटी रूपात गावशिवारात पाहायला मिळाला आहे. मनोरंजनासोबत प्रबोधन आणि शेतकर्‍यांचे प्रश्नही पोळा सणाच्या तोरणाखाली दिसून आले आहेत.
राज्य विधीमंडळाचे पावासाळी अधिवेशन नुकतेच संपले खरे पण विरोधकांकडून सरकारचे वाभाडे काढणे सुरुच आहे. ’पन्नास खोके एकदम ओके’ विरोधकांनी अशा जोरदार घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर अधिवेशनात निशाणा साधला होता. यावरून राजकीय वातावरण तापलं आणि शिंदे गटातील आमदार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी झाली. अशातच आता पोळा सणाच्या निमित्तानेही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून शिंदे गटाला पुन्हा एकदा डीवचलं आहे. पोळा सणानिमित्त बैलावर 50 खोके ओके लिहून शिंदे गटातील आमदारांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. आता काय या बैलाला शिंगावर घेणार का? मी तर म्हणतो आणि घेऊनच बघा, असं ट्विट करत मिटकरींनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

No comments:

Post a Comment