शिर्डी साई मंदिरात हारफुलें नेण्याचा वाद पेटला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

शिर्डी साई मंदिरात हारफुलें नेण्याचा वाद पेटला.

 शिर्डी साई मंदिरात हारफुलें नेण्याचा वाद पेटला.

सुरक्षा रक्षक आणि हारफुलें विक्रेत्यांमध्ये खडाजंगी.

सामाजिक कार्यकर्ते कोते यांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरू.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
शिर्डी ः शिर्डीतील साई मंदिरातील हार-फुले आणि प्रसादावारील बंदी हटवावी यासाठी आज फुल विक्रेते आणि ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. साई मंदिर प्रशासनाने भाविकांना साई मंदिरात हार फुले आणि प्रसाद घेऊन जाण्यास बंदी केली आहे.त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून शिर्डीमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे साई मंदिरात हार फुल प्रसाद याच्यावर बंदी उठवावी यासाठी आज हार फुले विक्रेत्यांनी साई मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवल्यामुळे सुरक्षारक्षक आणि व्यवसायिकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडालेली पाहायला मिळाली. यावेळी मंदिर परिसरातील विक्रेत्यांकडून हार-फुले हिसकावल्याने आंदोलक संतप्त झाले होते. जमिनीवर लोटांगण घालत आंदोलकांनी साईबाबा विश्वस्तांना सदबुद्बी दे असेही साकडे घालण्यात आले. यावेळी आंदोलकांना शांत करत त्यांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले.
शिर्डी साई मंदिरात हार-फुले आणि प्रसाद घेऊन जाण्यास बंदी असल्याने ही बंदी उठवावी या मागणीने जोर धरला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे साई समाधीवर फुले वाहून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. साईबाबा संस्थान प्रशासनाने काळे यांना आंदोलन करण्यास मज्जाव केला असुन तसे पत्रदेखील देण्यात आले आहे. त्यामुळे काळे यांना मंदिरात प्रवेश दिला जातो का याकडेच सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. संजय काळे आपल्या आंदोलनावर ठाम असुन कोपरगाव येथील त्यांच्या निवासस्थानापासुन शिर्डी असे 15 किलोमीटर ते पदयात्रा करणार आहेत.  तर तर दुसरीकडे आज साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची बैठक असल्याने यामध्ये बंदीचा निर्णय मागे घेतला जातो का याकडेही शेतकरी, व्यावसायिक आणि त्यावर अवलंबून असणारे मजूरांचे लक्ष लागून राहिले आहे. संजय काळे यांना आंदोलन करू नये यासाठी संस्थान प्रशासनाकडून पत्र देण्यात आले असले तरी साई समाधीवर फुल अर्पण करण्यावर बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय काळे यांच्या या आंदोलनाला शेतकरी, व्यवसायिक आणि ओवणी मजुरांचादेखील आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.

शिर्डी संस्थानाने हा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला याबाबत कोणतीही माहिती नाही. प्रशासनाने स्थानिक आमदार, खासदार यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे असतानाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला. - खासदार सुजय विखे.

श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांना नारळ हार फुले नेण्यास परवानगी द्यावी व ज्याप्रमाणे शासनाने दिनांक सात आठ 2009 च्या आकृती बंधानुसार 1052 कर्मचार्‍यांची पदस्थापना केली त्याचप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने संस्थानच्या सन 2004 च्या अधिनियमातील कलम 16 अन्वयेच्या तरतुदीनुसार शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार 598 कर्मचार्‍यांची पदस्थापना त्वरित करण्यात यावी आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ये उपोषण असंच सुरू राहील. - दिगंबर कोते, सामाजिक कार्यकर्ते.

No comments:

Post a Comment