शाडूच्या मातीपासून इको फ्रेंडली गणेश मुर्त्या घरी बसविण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

शाडूच्या मातीपासून इको फ्रेंडली गणेश मुर्त्या घरी बसविण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प.

 शाडूच्या मातीपासून इको फ्रेंडली गणेश मुर्त्या घरी बसविण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प.

पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या हरित सेनेचा पुढाकार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर-औरंगाबाद रोडवरील धनगर वाडीतील यशश्री अकॅडमीत सामाजिक विभागाच्या हरित सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “शाडूच्या माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवा” या आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य कार्यशाळेत 550 शालेय विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेस उत्सफुर्तपणे प्रतिसाद लाभला. शाडूच्या मातीपासून इकोफ्रेंडली बीजगणेश मुर्त्या साकारुन या मुर्त्यांची घरी प्रतिष्ठापणा करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
ही कार्यशाळा विभागीय वन अधिकारी परवीन पठाण, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप जिरे, हरियालीचे सुरेश खामकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यशाळेसाठी हरियाली संस्थेचे सहकार्य लाभले. यावेळी यशश्री अकॅडमीचे संस्थापक सदस्या अमृता शर्मा, उपाध्यक्षा प्रज्ञा जोशी, प्राचार्य कीरील पंडित, वनपाल अतुल बोरुडे उपस्थित होते. कार्यशाळेत मुर्तीकार धनंजय शिरसाठे व तेजस्वी देशपांडे यांनी शाडुमातीपासुन गणपती बनवण्याचे प्रात्याक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परवीन पठाण म्हणाल्या की, धार्मिक कार्यक्रम व उत्सवांना सामाजिक जोड दिल्यास बदल घडणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मुर्त्यांच्या विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होते. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मुर्त्या पर्यावरणपुरक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरेश खामकर यांनी प्रत्येक सण-उत्सव साजरा करताना निसर्ग व पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. पर्यावरणाचे प्रश्न बिकट होत चालले असून, या चळवळीत सर्वसामान्य नागरिकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment