31 ला कत्तलखाने व मांस विक्री केंद्र बंद जिल्हा प्रशासनाचे आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 27, 2022

31 ला कत्तलखाने व मांस विक्री केंद्र बंद जिल्हा प्रशासनाचे आदेश.

 पर्युषण महापर्वानिमित्त 31 ला कत्तलखाने व मांस विक्री केंद्र बंद  जिल्हा प्रशासनाचे आदेश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जैन समाजामध्ये महत्त्व असलेल्या पर्युषण महापर्वा निमित्त नगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने 31 ऑगस्टला  बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
पर्युषण महापर्वानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने तसेच मांसविक्री केंद्र दि.24/08/2022 व 31/08/2022 या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात बंद ठेवण्याचे आदेश अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड तथा शासन निर्णयानुसार  जिल्हाप्रशासनाने पारित केले. याची प्रत आयुक्त,पोलीस प्रशासन तथा जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन विभाग अहमदनगर यांना पुढील कडक कार्यवाही तसेच अंबलबजावणीसाठी पाठवण्यात आली आहे.
जैन समाजाच्या वतीने यश शहा यांनी  शासन निर्णयाला तथा अ‍ॅनीमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे पत्र तसेच मा.सर्वोच्च न्यायालय यांचे आदेश अपील पत्र सोबत जोडून जिल्हाधिकारी साहेब, जिल्हादंडाधिकारी साहेब, आयुक्तसाहेब, पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस उपअधीक्षक साहेब, आरोग्य अधिकारी साहेब  या सर्वांना निवेदन  इमेलद्वारे दिले होते. त्या निवेदनानुसार शासन निर्णयाला अनुसरुन जिल्हाप्रशासनाने बंदीचे आदेश पारित केले. तसेच जिल्हाप्रशासन आदेशाला अनुसरून पोलीस प्रशासनाने देखील शहा यांनी  कडक अंबलबजावणी करण्याबाबत संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस  प्रशासनाला याची प्रत तात्काळ पाठवली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here