वाडियापार्क येथील जलतरण तलावाचा ठेका रद्द करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

वाडियापार्क येथील जलतरण तलावाचा ठेका रद्द करा.

 शिवराष्ट्र सेनेचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

वाडियापार्क येथील जलतरण तलावाचा ठेका रद्द करा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वाडियापार्क येथे सुरु असलेल्या जलतरण तलावाच्या ठेक्याची मुदत संपूनही जिल्हाधिकारी व क्रीडा समितीच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार राजरोसपणे मनमानी पद्धतीने जलतरण तलाव सुरु ठेवत आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अनेक महिन्यांपासून तलावातील पाणी बदलले जात नाही. ठेकेदार हे पाणी स्वच्छ राहावे यासाठी मोठयाप्रमाणात क्लोरीनचा वापर करतात. त्यामुळे येथे येणार्‍या अहमदनगर शहरातील जलतरण पटूच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा साठा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. मात्र आर्थिक तडजोडीसाठी नगरकरांच्या जीवाशी खेळ चालू आहे. वारंवार नागरिकांनी व शहरातील विविध संघटनांनी क्रीडा विभागीय कार्यालयाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले आहे. यापूढील काळात अनूचित घटना घडल्यास त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. मा. जिल्हाधिकारी यांनी जलतरण तलावा बाबत तातडीने माहिती घेऊन ठेका रद्द करून कारवाई करावी अन्यथा शिव राष्ट्र सेनेच्या वतीने जलतरण तलावात जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा शिवराष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसूपे यांनी दिला आहे.
याच बरोबर लाजिरवाणी गोष्ट म्हणजेच जलतरण तलावाला सुरक्षा रक्षकच निर्लज्जपणे तलावामध्ये लघवी करत असतात. यामुळे जलतरण पट्टूंच्या घश्याच्या आजाराबरोबरच इतर आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. एक युवक पोहत असताना पाण्यामध्ये बुडत होता त्याचे पालकाचे लक्ष गेल्यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र त्याला खाजगी हॉस्पिटलमधील आय.सी.यु. मध्ये उपचार दिल्यामुळे तो वाचला यावरून सिद्ध होते की, ठेकेदारांच्या  दुर्लक्षामुळे अहमदनगर मधील जलतरण पट्टूच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू आहे. या जलतरण तलाव परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात व्यसनाधीन नागरिक येऊन दारुचे सेवन करत असतात.

No comments:

Post a Comment