खंडोबा मंदिर सुशोभिकरणासाठी दहा लाख रुपये मंजुर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

खंडोबा मंदिर सुशोभिकरणासाठी दहा लाख रुपये मंजुर.

 खंडोबा मंदिर सुशोभिकरणासाठी दहा लाख रुपये मंजुर.

माजी जिल्हा परिषद माधवराव लामखडे यांचे प्रयत्न मंदिर परीसराभोवती होणार भव्य सुशोभिकरण.


निंबळक - 
निंबळक येथील खंडोबा मंदिर सुशोभिकरणासाठी दहा लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. या कामाला लवकरत सुरवात होणार असल्याची माहीती माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी दिली.
निंबळक ( ता. नगर ) येथील खंडोबा मंदिराचे माजी जिल्हा परीषद परीषद माधवराव लामखडे यांच्या माध्यमातून क तिर्थक्षेत्र वर्गात समावेश केला. या खंडोबा  मंदिरास सुशोभीकरण करणे या कामासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावित कामाची पाहणी माजी जि.प.सदस्य माधवराव लामखडे ,जिल्हा परिषदेचे उपअभियंता मा.राऊत शाखा अभियंता आंबेडकर ,उपसरपंच बाळासाहेब कोतकर, माजी उपसरपंच घनश्याम म्हस्के,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब शिंदे,ग्रामविकास अधिकारी सविता लांडे  ,माजी उपसरपंच अशोकराव पवार, चेअरमन भाऊराव गायकवाड,सदस्य बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब जाजगे ,रावसाहेब खेसे,बापू तात्या कोतकर, भगवान निमोणकर, समीर पटेल यांनी पाहणी केली. यावेळी लामखडे म्हणाले I जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निंबळक येथे मोठया प्रमाणात विकास कामे मार्गी लावली आहे. खंडोबा मंदिर परीसरात चांगल्या प्रकारे सुशोभिकरण करणार आहे.

No comments:

Post a Comment