प्रथमच मनपा तर्फे शहरातील ढोल ताशा पथक यांच्‍यासाठी स्‍पर्धेचे आयोजन - मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

प्रथमच मनपा तर्फे शहरातील ढोल ताशा पथक यांच्‍यासाठी स्‍पर्धेचे आयोजन - मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे.

 प्रथमच मनपा तर्फे शहरातील ढोल ताशा पथक यांच्‍यासाठी स्‍पर्धेचे आयोजन - मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे.

अहमदनगर महानगरपालिका आयोजित सार्वजनिक गणेशोत्‍सव देखावे स्‍पर्धा 2022-2023 परिक्षण समितीची बैठक संपन्‍न.


अहमदनगर -
अहमदनगर महानगरपालिका आयोजित सार्वजनिक गणेशोत्‍सव देखावे स्‍पर्धा 2022-2023 करिता मा.परिक्षण समितीची शुक्रवार दिनांक 26/8/2022 रोजी दुपारी  12-00 वा. मा.महापौर यांनी महापौर कार्यालयामध्‍ये बैठक आयोजित केली. सदरील बैठक मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तसेच स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक मा.श्री.संजय चोपडा, सहाय्यक आयुक्‍त तथा गणेशोत्‍सव देखावे परिक्षण समितीचे अध्‍यक्ष श्री.सचिन राऊत, परिक्षण समितीचे  सदस्‍य दैनिक दिव्‍य मराठी पत्रकार श्री.मयुर मेहतानाटयकलाकार श्री.श्रेणिक शिंगवी , श्री.अनंत रिसे, श्रीमती शितल परदेशी, इतिहास शिक्षक श्री.पारूनाथ ढोकळे , प्रसिध्‍दी व सांस्‍कृतिक विभाग प्रमुख श्री.शशिकांत नजान, मनपा क्रीडा विभागाचे श्री. व्हिन्‍सेंट फिलीप्‍सश्री.राजेश लयचेट्टी, श्री.किशोर कानडे, श्री.सोनु चौधरी  आदी उपस्थित होते.

मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी निवड करण्‍यात आलेल्‍या सर्व न‍वनिर्वाचित सदस्‍यांचे स्‍वागत केले. सदर बैठकीच्‍या विषयानुरूप झालेल्‍या चर्चेनुसार सुचना व खालील  विषयाबाबत सविस्‍तरपणे बैठकीत चर्चा करण्‍यात आली.

स्‍पर्धा आयोजनातील निकष या विषयावर चर्चा करताना मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी समाजासाठी आवश्‍यक असणा-या विविध विषयावर चर्चा करून त्‍यानुसार स्‍वच्‍छता या विषयावर जनजागृती करणे तसेच प्‍लॅस्टिकमुळे होणा-या दुष्‍परिणामाबाबत जनजागृती होणे व प्‍लॅस्टिक बंदी बाबत आवाहन केले. झाडे लावा झाडे जगवाबेटी बचाव बेटी पढाओ अभियानमहिलांवरील होणारे अत्‍याचार रोखण्‍यासाठी प्रबोधनपर देखावे सादर करणेशाडू मातीपासून बनविलेल्‍या गणेश मुतींचा वापर जास्‍तीत जास्‍त मंडळांनी करावा व पर्यावरणाला त्‍याचा कोणताही धोका नसल्‍यामुळे या उपक्रमास प्राधान्‍य देण्‍यात यावे. तसेच कचरा संकलनासाठी डस्‍टबीनचा पुरेपुर वापर करून मंडळाजवळील परिसर जास्‍तीत जास्‍त स्‍वच्‍छता ठेवणे बाबत दक्षता घ्‍यावी व प्‍लॅस्टिक वस्‍तुचा वापर कटाक्षाने टाळावा असे आवाहन केले.

स्‍पर्धा विषयक पारितोषिके व निकषासह व परिक्षण समितीचा गणेशोत्‍सव देखावे पाहणी कार्यक्रम निश्चित करण्‍यात आला. त्‍यानुसार दिनांक 6/9/2022 ते 9/9/2022 पर्यत मनपा हद्दीतील देखावे पाहणीचे कामकाज करून शुक्रवार दिनांक 9/9/2022 रोजी होणा-या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होणारी गणेश मंडळे व मराठमोळया संस्‍कृतीची जपवणुक करणा-या समाज प्रबोधनपरशिस्‍तबध्‍द व पारंपारिक पध्‍दतीने मिरवणुक काढण्‍यात येणा-या मंडळांना प्राधान्‍य देणे बाबत समिती सदस्‍यांनी सुचित केले.

त्‍यानुसार मनपा हद्दीतील जास्‍तीत जास्‍त गणेश मंडळांनी देखावा स्‍पर्धेमध्‍ये भाग घेवून अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या स्‍पर्धेला प्रतिसाद दयावा व परिक्षण समितीस सहकार्य करावे असे आवाहन मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी व स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.कुमारसिंह वाकळे, परिक्षण समिती सदस्‍य यांच्‍या वतीने करण्‍यात आले.

यावेळी स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.कुमारसिंह वाकळे म्‍हणाले की, श्री गणेश मंडळ चांगले देखावे सादर करित असतात. नागरिक देखील मोठया संख्‍येने देखावे पाहण्‍यासाठी येतात. नागरिकांना प्रबोधन होण्‍याच्‍या दृष्टिने सध्‍या मोठया स्‍वरूपात जागतिक महामारी आलेली आहे. त्‍यामध्‍ये कोवीड, मंकी पॉक्‍स, एचआयव्‍ही, टि.बी. अशा संसर्ग जन्‍य आजारावर उपचार व घ्‍यावयाची काळजी याबाबत देखाव्‍याच्‍या माध्‍यमातून मंडळांनी समाज प्रबोधन करावे. 

तसेच  मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी नगर शहरामध्‍ये ढोल पथक मोठया स्‍वरूपात वादनाचे काम करित आहेत. त्‍यांना देखील प्रोत्‍साहन मिळण्‍याच्‍या दृष्टिने यावर्षी प्रथमच  ढोल ताशा पथकांसाठी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरची स्‍पर्धा दिनांक 2/9/2022 रोजी सकाळी 10 वा. प्रोफेसर कॉलनी चौक येथे घेण्‍यात येणार आहे. सदर वादकांचे परिक्षकांमार्फत पाहणी करून बक्षिस वितरण करण्‍यात येईल. प्रथम क्रमांकास रक्‍कम रूपये 7,000/- व सन्‍मानचिन्‍ह, द्वितीय क्रमांकास रक्‍कम रूपये 5,000/- व सन्‍मानचिन्‍ह. ढोलपथक वादकांसाठी फॉर्म सोबत अटी व शर्ती देण्‍यात येतील तरी या स्‍पर्धेमध्‍ये जास्‍तीत जास्‍त ढोल पथकांनी भाग घ्‍यावा असे आवाहन मा.महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांनी केले आहे.

ढोल ताशा पथकांना स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी श्री.फिलीप्‍स  9423796140 यांचेशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment