आजपासून सुरू झाली जामखेडची आनंदनगरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

आजपासून सुरू झाली जामखेडची आनंदनगरी.

 आजपासून सुरू झाली जामखेडची आनंदनगरी.

सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ सर यांच्या हस्ते झाले आनंदनगरी चे उद्घाटन.


जामखेड -
कोरोना नंतर प्रथमच दोन वर्षांनी नागेश्वर यात्रे निमित्ताने जामखेड येथे आनंदनगरी भरली आहे. याचे उद्घाटन नुकतेच आज दि २ अॉगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ सर यांच्या सह अनेक मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या आनंदनगरीचा तालुक्यातील नागरिकांनी लाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अभिजित राळेभात, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुका प्रमुख पांडुराजे भोसले, समता ग्रुप चे संतोष गव्हाळे, मनोज मैड (श्रीगोंदा), आर पी आय च्या प्रदेश आधक्ष शांताबाई लोंढे, विजय (टिल्लू) राळेभात, भाऊसाहेब शिंदे, श्रीगोंदा शिवसेना शहर अध्यक्ष समीर काझी, अमोल गव्हाणे वाहेद पठाण शहाबाज सय्यद, कृष्णा राळेभात, अजिंक्य राळेभात, तुषार बोथरा, सुरज राळेभात, सचिन देशमुख, आकाश घागरे, प्रविण कसाब, सागर गायकवाड, बाळु ढाळे, अथर्व कुलकर्णी, नाना खंडागळे, विशाल पवार, श्रीधर सिध्देश्वर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संचिन गायवळ सर म्हणाले की आज जामखेड येथे आनंदनगरी भरली आहे सर्व नागरिकांचे मी स्वागत करतो व या आनंदनगरी चा सर्वांनी आनंद घेऊन शोभा वाढवावी. या नंतर मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे म्हणाले की कोरोना नंतर प्रथमच दोन वर्षांनी जामखेड ची ही आनंदनगरी भरली आहे. आपल्या गावची ही यात्रा आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्व जामखेड वासीयांनी शिस्तीचे पालन करावे. आपल्या गावच्या या यात्रेचे नाव व स्वरुप वाढले आहे. सर्वांनी शांततेत या आनंदनगरी चा लाभ घ्यावा.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुका प्रमुख पांडुराजे भोसले बोलताना म्हणाले की जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील मार्केट किमीच्या आवारात ही आनंद नगरी भरली आहे. सर्व शिवभक्त व भाविकांना आनंद घेण्यासाठी याठिकाणी यावे. प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभत आहे. सर्वांनी यात्रेदरम्यान शांतते राहुन या यात्रेचा नावलौकिक वाढण्यासाठी प्रयत्न करावे.

No comments:

Post a Comment