ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्याला ओबीसी समाज जागा दाखवून देईल - तुळशीदास गोपाळघरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्याला ओबीसी समाज जागा दाखवून देईल - तुळशीदास गोपाळघरे

 ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्याला ओबीसी समाज जागा दाखवून देईल - तुळशीदास गोपाळघरे


जामखेड -
ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या भाजपच्या रवी सुरवसे यांना ओबीसी समाज जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
याबाबत माहिती अशी की, खर्डा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण हे जिल्हाधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी महिला असे काढण्यात आले, त्यामुळे ओबीसी समाजातील असंख्य कार्यकर्ते हे निवडणुकीच्या तयारीला लागले होते त्यातच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अहमदनगर यांच्याकडे हे जाहीर झालेले ओबीसी आरक्षण रद्द करावे अशी लेखी मागणी त्यांनी केली आहे.
त्यामुळे खर्डा जिल्हा परिषद गटातील ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे गोपाळघरे पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टी फक्त निवडणुकीच्या मतदाना पुरते ओबीसी समाजाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.खर्डा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण बदलले तर त्याला भाजपचे रवी सुरवसे हे जबाबदार राहणार आहेत पुढील काळात रवी सुरवसे जर कोणत्याही निवडणुकीला उभे राहिले तर ओबीसी समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे आवाहन त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment