जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस कडुन भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 1, 2022

जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस कडुन भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध.

 जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस कडुन भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध.


जामखेड -
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंबई येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात महाराष्ट्राचा अवमान करणारे वक्तव्य केले. यामुळे जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 
या वेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राजेंद्र पवार, अमित जाधव, प्रा. राहुल आहेर, प्रदीप (कुंडल) राळेभात, अमोल गिरमे, प्रकाश काळे, अवदुत पवार, प्रा विकी घायतडक, इस्माईल सय्यद, मोहन पवार, फोरोज बागवान, सुरेश भोसले, नरेंद्र जाधव, संतोष निगुडे, वैजीनाथ पोले, प्रकाश सदाफुले, सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना, गुजराती आणि राजस्थानी लोकांनी जर मुंबई मधून बाहेर काढले तर मुंबईमध्ये पैसा राहणार नाही. तसेच मुंबई ही आर्थिक राजधानीही राहणार नाही,असे वक्तव्य केले होते याच घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. याच अनुषंगाने आज दि १ अॉगष्ट रोजी जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. 
या वेळी प्रा मधुकर राळेभात बोलताना म्हणाले की संपुर्ण भारत देश संभाळण्यात मराठ्यांचा मोठा वाटा आहे. मात्र भाजप कडुन इतिहास पुसण्याचे काम केले आहे. बहुजनांना झाकुन ठेवण्याचे काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणुस देशाचा कणा आहे. मराठी माणसाचा आपमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करत आसतील तर याचा निषेध आम्ही करतो. राज्यपालांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा देशाला वेगळे करण्याचे काम कोणी करु नये. 
या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की राज्यपाल कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य मराठी माणसासह राज्याचा अपमान करणारे असून ज्यांच्याकडे घटनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. ती व्यक्ती घटनाविरोधीचे कृत्य करते आणि त्यावर केंद्रातील भाजपचे सरकार मुग गिळून बसले आहे. ही अतिशय निषेधार्ह बाब आसुन या घटनेचा आम्ही जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here