जामखेडमध्ये सकल जैन समाज तर्फे राष्ट्रसंत आनंदॠषी महाराजांच्या १२२ वी जयंती उत्साहात साजरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, July 31, 2022

जामखेडमध्ये सकल जैन समाज तर्फे राष्ट्रसंत आनंदॠषी महाराजांच्या १२२ वी जयंती उत्साहात साजरी.

 जामखेडमध्ये सकल जैन समाज तर्फे राष्ट्रसंत आनंदॠषी महाराजांच्या १२२ वी जयंती उत्साहात साजरी.

संतांचे विचार समाजाला एकसंघ ठेवू शकतात -आमदार रोहित पवार.


जामखेड -
राष्ट्रसंत आनंदॠषी महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या समाजाला प्रेरणादायी ठरतील. शांतता, संयम व नम्रता या गुणांचे आपण अनुकरण केले तर आपणासही काहीही कमी पडत नाही. महाराजांच्या विचारांवरच आनंदॠषी हॉस्पिटलचे काम सुरू आहे. यामुळे गोरगरीब जनतेला माफक दरात आरोग्य सेवेचा फायदा मिळत आहे असे मत माजी मंत्री व आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. 
सकल जैन समाजाच्या वतीनेआनंदॠषी महाराज यांची १२२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर दोन्ही आमदार प्रथमच एकाच वेळी एकत्र आले होते. दोघांनीही संतांच्या विचारांविषयी मार्गदर्शन केले. 
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, आचार्य आनंदॠषी महाराजच्या जन्मगावी गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा मिळते. आचार्य आनंदॠषी महाराजांनी सामान्य लोकांना समजेल असे ज्ञान दिले. देशभरात भ्रमंती केली. आजही समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी संतांचे विचारच प्रेरणादायी ठरतात. पुढील पिढीला संतांचे विचार समजावेत म्हणून अशा कार्यक्रमाची खरोखरच गरज आहे. 
या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, पिटु शेठ बोरा, महावीर बाफना, अभय शिगवी, अशोक बोरा, किशोर पितळे, अशोक कोठारी, विजय कोठारी, रमेश कटारिया, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, रमेश गुगळे, दिलीप बाफना, प्रविण चोरडिया, अशोक बाफना, सुनील कोठारी, पवन राळेभात, अमित चिंतामणी, अमोल गिरमे, शरद कार्ले, मनोज कुलकर्णी, सोमनाथ पाचरणे, पोपट राळेभात, तात्याराम पोकळे, राहुल बेदमुथ्था, मोहन पवार, नितीन सोळंकी, राहुल उगले, परंतु बोरा, अशोक शिंगवी, शितल शिंगवी,  विकास राळेभात, कांतीलाल खिवंसरा, विनोद नवले, प्रविण सानप, महावीर बाफना, महेश कटारिया, यांच्या सह परिसरातील जैन संघाचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment