दिलीप गुगळे, संतोष फिरोदियासह 11 प्रतिष्ठीतांविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 28, 2022

दिलीप गुगळे, संतोष फिरोदियासह 11 प्रतिष्ठीतांविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल.

 दिलीप गुगळे, संतोष फिरोदियासह 11 प्रतिष्ठीतांविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल.

जामखेड - खोटे नकाशे देऊन ले आऊट मंजुरीचे मोठे प्रकरण जामखेड शहरातून समोर आले. या प्रकरणात 11 प्रतिष्ठीतांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत विवेक काकासाहेब नेटके यांनी फिर्याद दाखल केली आहे. जामखेडमधील 11 उद्योजकांवर गुन्हे दाखल झाल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली.  जामखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी रजिस्टर क्रमांकाचा मूळ नकाशा सादर न करता पावतीच्या आधारे बनावट नकाशा तयार करून तो नगररचना कार्यालयात दाखल करुन जामखेड नगरपरिषदेेकडून त्या जागेच्या ले आऊटला मंजुरी मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण सन 2016 मधील आहे. बनावट नकाशाच्या आधारे  नगररचना कार्यालय, भूमी अभिलेख तसेच नगरपरिषदेची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक नेटके यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. त्यानुसार 11 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान जामखेड पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास हाती घेतला आहे. 

खालील 11 जणांवर गुन्हे दाखल 
दिलीप हरकचंद गुगळे, संतोष पोपटलाल फिरोदिया, प्रमोद धनराज बोगावत, तात्याराम रोहिदास पोकळे, सागर गुरुलिंग मिटकरी,अनंत विलास चिंतामणी,अमोल विलास चिंतामणी, कीर्ती अमोल चिंतामणी, शीला अनंत चिंतामणी, सौरभ नामदेव शिंदे, सुनील मनसुखलाल कोठारी

अटक टाळण्यासाठी धावाधाव 
खोटे नकाशे देऊन ले आऊट मंजुरीच्या प्रकरणातील 11 प्रतिष्ठीत आरोपींपैकी अनेकांनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here