आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून हात/पाय गमावलेल्या व्यक्तींना बसवण्यात येणार मोफत कृत्रिम अवयव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 28, 2022

आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून हात/पाय गमावलेल्या व्यक्तींना बसवण्यात येणार मोफत कृत्रिम अवयव

 आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून हात/पाय गमावलेल्या व्यक्तींना बसवण्यात येणार मोफत कृत्रिम अवयव.

कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचे मतदारसंघात आयोजन.


कर्जत/जामखेड |
विविध प्रकारच्या अपघातांमुळे अनेकवेळा हात किंवा पाय गमवावे लागलेल्या तसेच जन्मतः हात पाय नसलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच यावर करण्यात येणारे उपचारही सर्वसामान्यांना परवडणारे नसतात. आजकाल लाखोंचा खर्च कृत्रिम हात/पाय बसवायचे असल्यास येतो. हीच गोष्ट ओळखून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून हात/पाय नसलेल्या अथवा गमावलेल्या नागरिकांसाठी मोफत कृत्रिम हात/पाय बसवून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. 
सध्या भारतात या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या लाखात आहे आणि त्यांच्यात दरवर्षी 16 हजारांनी वाढ देखिल होते. हीच गोष्ट ओळखून कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यातील हात/पाय गमावलेल्या व्यक्तींसाठी जामखेड शहरातील आरोळे हॉस्पिटल येथे कृत्रिम अवयव बसवण्यासाठीचे शिबिर 31 जुलै 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.  ज्याद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची तुकडी मतदारसंघात येणार असून ते हात व पाय नसलेल्या लोकांची तपासणी करुन त्यांच्या पायाचे अथवा हाताचे मोजमाप करुन महिनाभरात त्यांना कृत्रिम पाय किंवा हात बसवण्यासाठी परत मतदारसंघात येणार आहेत. 
नागरिकांना मोफत कृत्रिम हात व पाय बसवण्यासाठी कुठेही बाहेरगावी जाण्याची अथवा पैसे खर्च करण्याची गरज नसल्याने त्यांचा लाखोंचा खर्च या माध्यमातून वाचणार आहे. तसेच या शिबिरामार्फत जयपूर फूटसारख्या अतिशय उच्च दर्जाचे अवयव हे संबंधित नागरिकांना देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे  मतदारसंघाच्या आजूबाजूच्या तालुक्यातील गरजू नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 7498905499 / 8263919041 या क्रमांकावर नागरिक संपर्क करू शकतात. आतापर्यंत रोहित पवार यांनी आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपाससारख्या शस्त्रक्रिया, फाटलेले व दुभंगलेल्या ओठावरील शस्त्रक्रिया  असे विविध उपक्रम मतदारसंघात गेल्या  अडीच वर्षांपासून मतदारसंघात सातत्याने चालू ठेवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे अवयव प्रत्यारोपण शिबिर देखील आयोजित  करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment