नगर तालुका जिल्हा परिषद गट आरक्षणात काहींचा फायदा तर काहींचा हिरमोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 28, 2022

नगर तालुका जिल्हा परिषद गट आरक्षणात काहींचा फायदा तर काहींचा हिरमोड

 नगर तालुका जिल्हा परिषद गट आरक्षणात काहींचा फायदा तर काहींचा हिरमोड.

अहमदनगर : नगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आरक्षणात मोठी घडामोड झाली असून यामध्ये अनेक स्थानिक नेत्यांना फायदा झाला तर अनेक जण  आरक्षणाने बाजूला गेल्याने त्यांचा हिरमोड झाला असल्याचे आज पहायला मिळाले. जिल्हा परिषद पंचायत समिती गट गण आरक्षणचा कार्यक्रम गुरुवारी (दि.28) पार पडला. 
वडगाव गुप्ता जिल्हा परिषद गट ओपन महिला राखीव झाला असल्याने विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांची अडचण झाली आहे पण त्याऐवजी रावसाहेब पाटील शेळके संधी घेऊ शकतात.
नवनागापूर जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने विद्यमान सदस्य माधवराव लामखडे यांची अडचण झाली आहे. मात्र वडगाव गुप्ता मधुन त्यांच्या सुनबाई डॉ. प्रांजल लामखडे या निवडणूक मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.
नागरदेवळे जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव झाला असल्याने विद्यमान सदस्य शरद झोडगे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नीला संधी मिळू शकते. माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डीले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले या निवडणुकीत उतरू शकतात. 
दरेवाडी जिल्हा परिषद गट खुला पुरुष  झाल्याने विद्यमान सदस्य संदेश कार्ले यांची सोय झाली आहे तर तयारीला लागलेले बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डीले यांचीही सोय झाली आहे . दीपक कार्ले सुद्धा जिल्हा परिषद लढण्याची तयारी करत आहेत.
चिंचोडी पाटील जिल्हा परिषद गट ओपन महिला झाल्याने विद्यमान सभापती सुरेखा गुंड यांची सोय झाली असून संभाव्य उमेदवार प्रवीण कोकाटे यांना त्यांच्या पत्नीसाठी तयारी करावी लागणार आहे. माजी सदस्या महानंदा लांडगे यांचीही सोय झाली आहे
वाळकी जिल्हा परिषद गट खुला पुरुष झाल्याने  माजी सदस्य बाळासाहेब हराळ, आणि लढतीसाठी तयारी करणारे बाजार समिती सभापती अभिलाष घिगे यांची सोय झाली आहे.

No comments:

Post a Comment