यशवंत प्रतिष्ठान तर्फे ज्ञानेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 25, 2022

यशवंत प्रतिष्ठान तर्फे ज्ञानेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता.

 यशवंत प्रतिष्ठान तर्फे ज्ञानेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता.

कामिनी एकादशी निमित्त दरवर्षी  स्वच्छता मोहीम राबविणार. उदयन गडाख.


नेवासा - 
कामिनी एकादशी निमित्त ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा येथे मोठी यात्रा भरते दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात मोठ्या उत्साहात यात्रा ही संपन्न होते.
रवी दि 24 जुलै 2022 रोजी कामिनी एकादशी संपन्न झाल्यानंतर ज्ञानेश्वर मंदिर परिसर व संत तुकाराम महाराज मंदिर परिसर ,ज्ञानेश्वर मंदिर रस्ता या परिसरात यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवण्याची संकल्पना युवा नेते उदयन गडाख यांनी मांडली होती त्यानुसार सोम दि 25 जुलै 2022 रोजी ज्ञानेश्वर मंदिर परिसरात सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत नेवासा येथील यशवंत  सामाजिक प्रतिष्ठानचे 100 कार्यकर्ते ,ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे 400 विद्यार्थी यांचेसह युवा नेते उदयन गडाख यांनी सहभागी होत स्वच्छता केली.मोठ्या प्रमाणवर असलेल्या प्लास्टिक पिशव्या,फुले,व इतर सर्व निर्माल्यांचे व्यवस्थित रित्या संकलन करून परिसराची स्वच्छता करण्यात आली.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरिक ही या स्वच्छता मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.याप्रसंगी बोलतांना उदयन गडाख म्हणाले आपणा सर्वांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम राबवता आली याचे मोठे आत्मिक समाधान लाभले.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केली याचा सार्थ अभिमान आहे.यापुढे दरवर्षी कामिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर मंदिर,संत तुकाराम महाराज मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जाईल आपणही सर्वांनी सहभागी व्हावे व ज्ञानेश्वर मंदिर व नेवासा शहर परिसर नेहमी स्वच्छ व सुंदर राहील यासाठी नेहमी प्रयत्नशील रहावे व स्वच्छता यज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन उदयन गडाख यांनी उपस्थितांना केले याप्रसंगी ह भ प शिवाजी महाराज देशमुख श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर यांनी उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या स्वच्छता वारी या उपक्रमाचे कौतुक केले व युवा नेते उदयन गडाख यांनी तरुणासह सहभागी होत केलेली स्वच्छता ही निश्चितच दिशादर्शक आहे यशवंत प्रतिष्ठानच्या उपक्रमात तरुणांनी उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रमात सहभागी होत त्यांना पाठबळ द्यावे असे प्रतिपादन ह भ प शिवाजी महाराज देशमुख यांनी केले याप्रसंगी नेवासा शहर स्वच्छता करणाऱ्या नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी महिला यांचा उदयन गडाख यांच्या हस्ते सत्कार करून विशेष सन्मान करण्यात आला याप्रसंगी
भाऊसाहेब वाघ, रामभाऊ जगताप, राजेंद्र चौधरी, गफूरभाई बागवान, कु प्रतीक्षा तुपे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नारायण लोखंडे, शिवाजी जंगले,  अभिजित मापारी,राजेंद्र मापारी, असिफ पठाण, प्रा सुनील गर्जे ,इम्रान दारुवाले,संदिप बेहळे, अल्ताफ पठाण, रणजित सोनवणे,  जितेंद्र कुऱ्हे, अभय गुगळे, जालिंदर गवळी, राजेंद्र काळे, विनायक नळकांडे ,सुनील साळुंके,दीपक धनगे, महेश कोकणे,राहुल सूर्यवंशी आदींसह यशवंत सामाजिक  प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ,श्री ज्ञानेश्वर महाविद्यालययाचे विद्यार्थी ,प्राध्यापक आदी उपस्थित होते. आभार प्रा.देविदास साळुंके मानले.

दरवर्षी ज्ञानेश्वर मंदिर व परिसरात कामिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहीम दरवर्षी राबवु. - उदयन गडाख

No comments:

Post a Comment