‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 2, 2022

‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.

 ‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.

राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला.


अहमदनगर - निविदा भरून अटी-शर्ती न पा
ता वेळेवर काम न करणार्‍या अर्धवट कामे करणार्‍या शहानजवान रफिक शेख (एस एफ कंट्रक्शन) यांना मनपा प्रशासनाने कामे करण्यास प्रतिबंधित करून काळ्या यादीत टाकल्यामुळे याचा राग धरून राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक अविनाश घुले यांनी टक्केवारी मागितल्याचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक अविनाश घुले यांनी दिली असून प्रभागातील कामे दर्जेदार व्हावे याकरता आपण प्रयत्नशील असून आणि कामे दर्जेदार करण्यासाठी आपण महानगरपालिका यंत्रणेमार्फत जो ठेकेदार राहील त्यांना वारंवार ज्या गोष्टी सांगत असतो मात्र ज्या ठेकेदाराने माझ्यावर आरोप केले आहेत. त्या ठेकेदाराच्या विरोधात महानगरपालिकेतील अनेक नगरसेवकांनी लेखी तक्रार केल्या आहेत. त्या रागातून आपल्यावर खोटे आरोप होत असल्याचा खुलासा नगरसेवक अविनाश घुले यांनी केला आहे. 

शहानजवान रफीक शेख यांची एस. एफ. शेख कंन्स्ट्रक्शन, अहमदनगर ही ठेकेदार संस्था महानगरपालिकेत वेगवेगळ्या निविदा भरून विविध विकास कामे करित असतात परंतु संबंधीत संस्था महानगरपालिकेची विकास कामे घेतात. सदरील कामे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर अटी व शर्तीप्रमाणे काम सुरू न करणे, विहित वेळेत काम पूर्ण न करणे सुरू केलेली कामे अर्धवट अवस्थेत ठेवून अनेक दिवस बंद ठेवतात. या कारणांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा प्रशासन व नगरसेवकांबद्दल रोष निर्माण होत आहे.

खोटे आरोप करणारा ठेकेदार संस्थेची महानगरपालिकेची नोंदणी रद्द करून या संस्थेस महानगरपालिकेचे कामे घेण्यास प्रतिबंधीत करण्यात येवून त्यांना काळया यादीत टाकण्यात यावे तसेच सध्या या संस्थेचे महानगरपालिकेकडे चालू असलेल्या कामाची सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची देयके अदा करू नयेत तसेच सध्या सुरू असलेल्या निविदे प्रक्रियेत त्यांनी भरलेल्या निविदा स्विकारू नयेत व त्या रद्द करण्यात याव्यात. असे पत्र महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहीणी शेंडगे तसेच स्थायी समितीचे विद्यमान सभापती कुमार वाकळे यांच्यासह महानगरपालिकेतील नगरसेवकांनी आपल्या सहीनिशी निवेदन दिले आहे. याचा राग मनात धरून ठेकेदार आपल्यावर चुकीचे आरोप करत असल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment