मुहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधाने केलेल्या नुपूर शर्मावर कडक कारवाई करावी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 10, 2022

मुहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधाने केलेल्या नुपूर शर्मावर कडक कारवाई करावी.

 मुहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केलेल्या नुपूर शर्मावर कडक कारवाई करावी.

जामखेड येथील सर्व मुस्लीम समाजच्या वतीने निवेदन....


जामखेड -
भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया येत असताना, आता याचे पडसाद स्थानिक पातळीवर सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून तसेच नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी म्हणून आज जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला 
      मुस्लिम बांधवांच्या नमस्कार बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत जामखेड शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे आपापली दुकाने दिवसभर बंद ठेवली व बंदला पाठिंबा दिला. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली तसेच निवेदनाच्या प्रती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी अहमदनगर व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिले आहे. 
मोहम्मद पैगंबर यांच्यबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले, तर नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली असली तरी त्यांना तुरुंगात पाठवण्याच्या मागणीवर मुस्लिम समाज ठाम आहे. त्यातच आता स्थानिक पातळीवर सुद्धा या प्रकरणाचे पडसाद उमटत आहे.
वक्तव्याविरोधात आखाती देशांमध्ये खळबळ
इराण, कुवेत, कतार आणि पाकिस्तानसह अनेक देशांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय राजदूताला बोलावले. तर कतार, इराण, इराक, कुवेत, इंडोनेशिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, बहरीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, जॉर्डन,ओमान, लिबिया, मालदीव यांनी विरोध केला आहे.
इस्लामिक कोऑपरेशनच्या 57 सदस्यीय संघटनेकडून निषेध
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुस्लिम देश सातत्याने आक्षेप घेत आहेत. कतारने रविवारी सर्वप्रथम आपली नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर कुवेत, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तानसह सुमारे 15 देशांनी भारतावर आक्षेप घेतला आहे. 57 सदस्यीय इस्लामिक कोऑपरेशन (OIC) संघटनेनेही पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. ओआयसीने संयुक्त राष्ट्रांना भारतातील मुस्लिमांना हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. ओआयसीने संयुक्त राष्ट्रांना भारतातील मुस्लिमांना हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment