आई तुळजाभवानी तुळजापुर मंदीरात लाडु महोत्सव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 30, 2022

आई तुळजाभवानी तुळजापुर मंदीरात लाडु महोत्सव

 आई तुळजाभवानी तुळजापुर मंदीरात लाडु महोत्सव.


तु
ळजापुरच्या श्री आई तुळजाभवानी चरणी आम्ही देवकर उर्फ भगत कुटूंबीय पलंग पालखीचे मुख्य मानकरी आणि बु-हाणनगर येथील देवीचे मुख्य पुजारी यांच्या वतीने आमचे पेंशज ज्यांना साक्षात आई तुळजाभवानी प्रसन्न होऊन पलंग पालखीचा वर दिला होता असे श्री संत जानकोजी देवकर उर्फ भगत यांच्या स्मरणार्थ आम्ही तुळजापुर येथे शुकवार दिनांक 3/6/2022 रोजी श्री तुळजाभवानी मंदीरात 11000 हजार लाडु वाटपाचा लाडु महोत्सव करणार आहोत.

आम्ही देवकर उर्फ भगत कुटुंबीय दरवर्षी शारदीय नवरात्रात मध्ये सातव्या माळेला पलंग व पालखी घेऊन तुळजापुर येथे जात असतो. तेथे आमचे पुर्वज श्री संत जानकोजी देवकर यांच्या तुळजापुर येथील शुक्रवार पेठेतील समाधीवर सदर पालखी व पंलंग ठेवण्यात येतो व नवमीच्या दिवशी रात्री 12.00 वाजता मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापुर व व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तथा तहसीलदार तुळजापुर व भोपे पुजारी यांच्या हस्ते पलंग व पालखी पुजा होते व त्यानंतर संपूर्ण तुळजापुर नगरीमध्ये सवादय पलंग व पालखीची मिरवणून निघुन पहाटे 4.00 वाजता तुळजाभवानी मंदीरात जाते या मिरवणूकी साठी पालखीला खांदेकरी मानकरी बार्शी तालुक्यातील गोरमाळे व आगळगाव येथील गावकर्‍यांचा मान आहे. मंदीरामध्ये पालखी गेल्यानंतर साक्षात तुळजाभवानीची मुर्ती तुळजाभवानीचे भोपे पुजारी आम्ही आणलेल्या 101 साड्या नेसवून व भाजी भाकरीचा नैवदय दाखवून आई जगदंबेला गाभा-यातून काढून सदर पालखीमध्ये बसवून सर्व भोपे पुजारी व आम्ही देवकर कुटूंबीय मंदीरा भोवती प्रदक्षिणा मारुन शारदीय नवरात्रीचा सिमोलंघन कार्यक्रम होतो या दरम्यान तुळजाभवानी मंदीरात पालखी ओट्यावर पालखी बसवून सर्व भोपे पुजा-यांच्या मानाच्या आरत्या व नैवदय याठिकाणी होतात. त्यानंतर पालखींच्या पाळण्याचा होमामध्ये विर्सजन होते. सर्व भोपे पुजारी आई जगदंबेला आम्ही आणलेल्या पलंगावर पोर्णिमे पर्यंत निद्रीस्त करतात. पोर्णिमेच्या दिवशी पुन्हा भाजी भाकरीचा नैवदय दाखवून आई जगदंबेला पुन्हा सिहांसनावर विराजमान करतात व मागील वर्षाचा पलंगाला होगामध्ये विर्सजन करतात. सदर उत्सवामध्ये आमच्या कुटूंबातील बु-हाणनगर येथील सर्व देवकर उर्फ भगत परीवार सहभागी असतो या लाडु महोत्सवासाठी मा. श्री कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापुर सी कोल्हे मॅडम व्यवस्थापक तथा तहसीलदार श्री तुळजाभवानी गंदीर संस्थान, मा. श्री सिध्देश्वर शिंदे साहेब लेखाधिकारी, भोपे पुजारी मंडल अध्यक्ष मा.श्री अमरराजे परमेश्वर कदम, मा. राज्यमंत्री मा. शिवाजीराव कर्डिले साहेब, श्री सौदागर तांदळे तहसीदार तुळजापुर, श्री योगेश खरमाटे प्रांतअधिकारी तुळजापुर श्री सचिन रोजकरी विश्वस्त तुळजाभवानी मंदीर संस्थान, श्री अजित दादा कदम परमेश्वर मा. नगर अध्यक्ष तुळजापुर, श्री संतोष कदम परमेश्वर नगरसेवक तुळजापुर, सर्व श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अधिकारी व कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment