एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 30, 2022

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री.


मुंबई -
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजपा आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच आज फक्त राजभवनात एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here