नऊ मोबाईल शोधण्यात सायबर विभाग व जामखेड पोलीसांना यश.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 8, 2022

नऊ मोबाईल शोधण्यात सायबर विभाग व जामखेड पोलीसांना यश....

 नऊ मोबाईल शोधण्यात सायबर विभाग व जामखेड पोलीसांना यश....

मोबाईल धारकांनी मानले जामखेड पोलीसांचे आभार.


जामखेड - 
मोबाईल गहाळ झाले किंवा कोठे आपण विसरून आलो परत तो मोबाईल आपल्या ला मिळाला नाही आपण असे मोबाईल सोडून देत होतो परंतु जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी गहाळ मोबाईल रजिस्टरी नोंद केले व त्याची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक थोरात ,पोलीस कॉन्स्टेबल आबा आवारे व पोलीस कॉन्स्टेबल विजय कोळी यांचेवर दिली त्यांनी गहाळ झालेल्या मोबाईल चा मोबाईल सेल चे प्रशांत राठोड यांचे संपर्कात राहून पाठपुरावा केला व गेल्या 4 ते 5 महिन्यापासून गहाळ झालेले 9 मोबाईल मिळवण्यात यश आले  ते मोबाईल आज रोजी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने मोबाईल धारकांना परत करण्यात आले. 
या गहाळ झालेल्या मोबाईलमध्ये सॅमसंग ,रियल मी, रेडमी ,ओप्पो ,विवो अशा विविध कंपन्यांचे मोबाईल होते. या नऊ मोबाईलची किंमत अंदाजर 2 ते 2.5 लाख पर्यंत आहे. 
या चांगल्या कार्यबद्दल जामखेड ग्रामस्थांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड , पी एस आय राजू थोरात ,पी एस आय अनिल भारती, पो ना अविनाश ढेरे, पो कॉ आबा आवारे,पो कॉ विजय कोळी, पो कॉ दत्तू बेलेकर, पो कॉ अरुण पवार,पो कॉ संग्राम जाधव,पो कॉ संदीप राऊत, सायबर विभागाचे प्रशांत राठोड,एनसीसी प्रमुख मयुर भोसले, पर्यवेक्षक प्रकाश सोनवणे व मोबाईल धारक उपस्थित होते. 
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मनोगत मध्ये सांगितले की मोबाईल हा एक महत्त्वाचा घटक असून मोबाईलच्या किमतीपेक्षा त्यामध्ये डाटा व डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचे असतात व बाजारामध्ये  अनेक मोबाईल कमी किमतीत विकला जातो तो मोबाईल चोरीचा आहे असू शकतो कमी किमतीच्या मोहात न पडता तरुणांनी असे मोबाईल सापडले असता  पोलीस स्टेशन मध्ये जमा करावेत असे आवाहन केले.
सर्वसामान्य मोबाईल हरवल्यास त्या व्यक्तीस अतिशय ताण तणावातून जावे लागते व त्या व्यक्तीचा मोबाईल सापडल्यास त्याच्यावर चेहऱ्यावरील समाधान पहिल्यास आम्हाला त्याचे आम्हाला काम केल्याचे समाधान मिळते. 
या कामासाठी आमची पोलीस टीम व मोबाईल सेल विभागाचे प्रशांत राठोड यांनी उत्कृष्ट कार्य केले. असे मनोगत व्यक्त केले. व मोबाईल धारकांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment