ना सत्तेसाठी; ना स्वार्थासाठी; मंडळाची लढाई सभासदांच्या हितासाठी.... अशोकराव नेवसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 21, 2022

ना सत्तेसाठी; ना स्वार्थासाठी; मंडळाची लढाई सभासदांच्या हितासाठी.... अशोकराव नेवसे

 ना सत्तेसाठी; ना स्वार्थासाठी; मंडळाची लढाई सभासदांच्या हितासाठी - अशोकराव नेवसे


कर्जत :-
आदर्श बहुजन शिक्षक संघ गेल्या वीस वर्षापासून शिक्षकांच्या हितासाठी काम करत असून शिक्षक बँकेच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करून सक्षमपणे लढनार असल्याचे मनोगत अशोक नेवसे यांनी व्यक्त केले. 
आदर्श बहुजन शिक्षक संघ हे शिक्षक, विद्यार्थी आणि समाज या तीनही स्तरावरती कसलीही स्वार्थी भावना न ठेवता सभासद हिताचे काम करत आहे. शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटना शासन दरबारी भांडत आहे. तळागाळातील सर्वसामान्य शिक्षकाला न्याय मिळावा म्हणून ऑनलाइन शिक्षक बदल्याचा आग्रह संघटनेने धरला आणि त्याचा पाठपुरावा केल्याने  बदल्या ऑनलाइन होत आहेत. संघटनेने आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षणाचे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू केला त्यानंतर महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन 2006 पासून शासन स्तरावर असे पुरस्कार देणे सुरू केले. शिक्षक बँकेच्या आज पर्यंत निवडून दिलेल्या संचालकांनी बँक रुपी कामधेनुला लुटण्याचे काम केले आहे. याविरोधात इब्टा प्रणित बहुजन मंडळाने वेळोवेळी जाहीर निषेध करून, आंदोलने करून सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पाडले आहे. शिक्षक बँकेतील कर्मचाऱ्यांच्या अनियमित पदोन्नती बाबतही बहुजन मंडळाने आंदोलन केलेले आहे. बहुजन मंडळ हे अभेद्य असून निष्कलंक आहे. शिक्षक सभासदांना मत मागण्याचा अधिकार फक्त बहुजन मंडळालाच आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन मंडळाची चर्चा सुरू आहे. एक समर्थ पर्याय म्हणून या मंडळाकडे पाहिले जाते, म्हणूनच ही लढाई काही मंडळांच्या अस्तित्वाची आहे तर काहींच्या प्रतिष्ठेचे आहे ,पण बहुजन मंडळाने ही निवडणूक सभासदांच्या हितासाठीच केलेली आहे  असे मत आदर्श बहुजन शिक्षक संघाचे जिल्हा सचिव अशोक नेवसे यांनी व्यक्त केले आहे.
शिक्षक बँकेसाठी 69 तर विकास मंडळासाठी 55 बहुजन मंडळाच्या उमेदवारांनी आज अखेर अर्ज दाखल करण्यात आले असून पुढील रणनीती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment