भविष्यकाळात पै. ऋषिकेश सुवर्ण पदकाचा मानकरी होईल - आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 9, 2022

भविष्यकाळात पै. ऋषिकेश सुवर्ण पदकाचा मानकरी होईल - आ. संग्राम जगताप

 भविष्यकाळात पै. ऋषिकेश सुवर्ण पदकाचा मानकरी होईल - आ. संग्राम जगताप

पै.ऋषिकेश लांडेने पटकावले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नालेगावचे पैलवान ऋषिकेश लांडे यांनी 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे मध्ये 86 किलो वजन गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे नगर शहराच्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक अभिमानाची बाब आहे. भविष्य काळामध्ये पै.ऋषिकेश लांडे सुवर्ण पदकाचा नक्कीच मानकरी होईल असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे मध्ये 86 किलो वजन गटामध्ये नालेगावचे पै.ऋषिकेश लांडे याने रौप्य पदकाची कमाई केल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांचे हस्ते पै.ऋषिकेश लांडे याचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
आ.जगताप पुढे म्हणाले की, कुस्ती क्षेत्रामध्ये नगर शहराला एक वारसा लाभलेला आहे. तो वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम नवीन पिढीतील मल्ल करत आहेत. विविध क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कुस्ती खेळामध्ये यशाचे शिखर गाठता येते, आजच्या युवकांनी मैदानी खेळाकडे वळावे यामुळे आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते. नालेगावची कुस्तीक्षेत्रा मध्ये एक वेगळी ओळख आहे कुस्ती खेळामुळे समाजामध्ये एक प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशाबद्दल समस्त नालेगावातील ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या मिरवणुकीत नगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक मा. गणेशजी कवडे,  नगरसेवक मा. शाम (आप्पा) नळकांडे, मा. संभाजी कदम मा. संजय शेंडगे, मा. अनिल (भाऊ) बोरुडे,आदी नगरसेवकांसह, कुस्ती क्षेत्रातील  पै. मन्नी शिंदे, पै. सुरेश आंबेकर, पै. योगेश पवार, पै. राम नळकांडे पै.बाळासाहेब भापकर, पै. धनंजय खर्से, पै. युवराज करंजुले, पै. वसंत पवार, पै. सुनिल कदम, वैभव वाघ, संतोष लांडे, विकी वाघ, गणेश दातरांगे, संदीप दातरांगे,बाप्पू शेळके आदींसह अनेक मान्यवर तसेच बहुसंख्य नागरिक माता भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. यासंपूर्ण मिरवणुकीचे आयोजन आणि नियोजन मा. संजय (काका)शेळके, मा. मिलिंद जपे, मा. बंडू शेळके यांनी केले होते.
64व्या राज्य वरिष्ठ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशन सातारा येथे चालू आहे.या स्पर्धेत 86 किलो गादी विभागात अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत नालेगावातील मल्ल पै. ऋषिकेश लांडे याने  झंझावती कुस्त्या करुन अकोला,सातारा, सोलापूर, कोल्हापूर येथील मल्लांवर गुणाधिक्याने, तांत्रिक गुणाधिक्याने आणि चीतपटीने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात  नाशिकचा मल्ल पै. बाळू बोडके याच्याकडून पराभव पत्करावा लागला. पै.ऋषिकेश लांडे यास रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पै.ऋषिकेश लांडे याचे पिताश्री कै.प्रभाकर लांडे हे नामवंत मल्ल होते. आपल्या मुलानेदेखील मोठा पहिलवान व्हावा हे त्यांचे स्वप्न होते.बालवयातच ऋषिकेशने नाना पाटील वस्ताद तालीम येथे पै. अनिल म्हस्के (वस्ताद) यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरवात केली. सध्या तो छत्रपती कुस्ती संकुल पारनेर येथे मा. पै. युवराज (भाऊ) पठारे आणि महाराष्ट्र केसरी पै.अशोकभाऊ शिर्के वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहे.
64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे मध्ये नालेगावचे मल्ल पै.ऋषिकेश लांडे यांनी रौप्यपदक पटकावल्याने नालेगाव ग्रामस्थांनी जल्लोष करीन मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment