मैदाने गाजवण्याची नगरची परंपरा कायम- संभाजी कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 9, 2022

मैदाने गाजवण्याची नगरची परंपरा कायम- संभाजी कदम

 मैदाने गाजवण्याची नगरची परंपरा कायम- संभाजी कद

महाराष्ट्र केसरी रौप्प पदक विजेता पै.ऋषिकेश लांडे याचा नाना पाटील तालिमीच्यावतीने सत्कार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोल्हापूरनंतर नगर हे कुस्तीचे मोठे केंद्र राहिले आहे, नगरमधून अनेक मल्लांनी आपल्या ताकदीने देश व राज्य पातळीवरील अनेक मैदाने गाजवली आहेत. ही पारंपरा कायम ठेवत पै.ऋषिकेश लांडे यांनी सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदक मिळवून नगरच्या कुस्ती क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. कुस्ती क्षेत्रात या यशाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कुस्तीला प्रोत्साहन दिल्यास नगरमधूनही अनेक मल्ल नगरचे नाव देशपातळीवर चमकवतील, असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 86 किलो गादी विभागात नगरचा मल्ल पै.ऋषिकेश लांडे याने रौप्य पदक मिळविल्याबद्दल त्याचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, संदिप दातरंगे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी गणेश कवडे म्हणाले, आमच्या नालेगावच्या नाना पाटील वस्ताद तालिमीचा मल्ल पै.ऋषिकेश लांडे यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मिळविलेले यश हे इतरांना प्रोत्साहित करणारे आहे. जिद्द, कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्याने मिळालेले हे नगरकरांसाठी अभिमानास्पद असेच आहे. नवोदित मल्लांना प्रोत्साहन देऊन त्यांना विविध स्पर्धेसाठी सहकार्य करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यावेळी संजय शेंडगे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे यांनीही मनोगतातून पै.ऋषिकेश लांडे याच्या यशाचे कौतुक करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. पै. ऋषिकेश यानेही सर्वांच्या सहकार्याने मिळविलेले हे यश प्रोत्साहन देणारे ठरणार आहे. आता पुढील स्पर्धेत असेच यश मिळवू, असे सांगितले. यावेळी मनोहर शिंदे, काका शेळके, राधेशाम धूत, युवराज पठाडे, अमोल सुरसे, अनिल कवडे, बंडू शेळके, राहुल लांडे, बजरंग शेळके, बापू शेळके, राजेंद्र म्हस्के, अनिल म्हस्के, मिलिंद जपे, अमर शिंदे, बाळा वाघमारे, जयंवंत वाघ, सोमनाथ झिंजे, रघुनाथ लांडे आदी सह असंख्य मल्ल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here