रस्त्याच्या कामांसाठी शासनाकडून 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 9, 2022

रस्त्याच्या कामांसाठी शासनाकडून 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

 रस्त्याच्या कामांसाठी शासनाकडून 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

सर्वांना बरोबर घेऊन शहराचा कायापालट करू- महापौर

राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्यामुळे व नगर मनपात शिवसेनेची सत्ता असल्यामुळे शहरातील प्रश्न वेगाने सुटत असून याआधीही प्रभाग क्र. 8 व 15 साठी 20 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. विकास कामांना निधी मिळावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या मिळणार्‍या निधीतून शहराचा कायापालट करण्यात येईल.
- रोहिणीताई शेंडगे, महापौर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून प्रभाग क्रमांक 4,5,15,16 मधील 18 रस्त्यांची कामे पूर्ण करणार असून सर्वांना बरोबर घेऊन शहरातील प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून शहराचा कायापालट करू असा विश्वास महापौर रोहीणी शेंडेगे यांनी व्यक्त केला आहे.
या निधीतून केडगाव येथील झेंडा चौक ते वैष्णवनगर, भूषणनगर येथे राधेश्याम कॉम्प्लेक्स ते फुंदे घर रस्ता, आयोध्या नगर चौक ते शंभूराजे चौक, रभाजी नगरमध्ये सापते घर ते पवन कोतकर घर, मुरकुटे घर ते नेप्ती रोड, हडको परिसरातील मेघाग्नी कॉलनी ते भगत मळा ते गणेश चौक ते मकासरे हेल्थ क्लब, पराग कॉर्नर ते भगत मळा, केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट मधील अर्बन बँक ते सुमेश इंडस्ट्रीज, महावीर इंडस्ट्रीज ते सौरभ इंडस्ट्रीज, नेक टेक्निकल ते सारडा फॅशन्स, अ‍ॅटो इंजिनिअर्स ते चोपडा पॉली, धनलक्ष्मी एन्टरप्राईज ते दत्त मुद्रणालय, बोगावत फॅक्टरी ते श्री प्लॅस्टीक, बोरा मेटल इंडस्ट्रीज ते वंदन इंजिनिरिंग, सुप्रिम इंडस्ट्रीयल ते आझाद सॉ मिल, यशिका इंडस्ट्रीज ते मायक्रोटेक इंडस्ट्रीज, ओम इलेस्ट्रीकल्स ते सुची इंजिनिअरींग, आदित्य पॅकेजिंग ते रवी अ‍ॅबट, इंडस्ट्रीयल गेट ते नवकार स्टोअर व रुपरतन मेटल ते महावीर फरसाणपर्यंत आदी रस्ते काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वास महापौर शेंडगे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment