महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढणार 2 फरार आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 9, 2022

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढणार 2 फरार आरोपी गजाआड.

 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढणार 2 फरार आरोपी गजाआड.

एलसीबीची श्रीरामपूर मधील कांदा मार्केट जवळ कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
शहरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून ऍक्टिवा मोपेडवरून पळून जाणार्‍या कंबर रहीम मिर्झा वय 37 रा. वार्ड नं 1 श्रीरामपूर अनिल रावसाहेब चव्हाण वय 25 रा. दत्तनगर स्टेशन रोड राहुरी या दोन सराईत गुन्हेगारांना श्रीरामपुर मधील कांदा मार्केट जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांचेकडून 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी कंबर रहिम मिर्झा हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी व फसवणूक असे याच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात  केरळ, कर्नाटक, गुजरात या राज्यात 7 गुन्हे व महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सोलापुर, धुळे व अहमदनगर जिल्ह्यात 24 असे एकूण 31 गुन्हे दाखल आहेत. याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 16 फेब्रुवारी 22 रोजी 4 वा. सुमारास रस्त्याने पायी जात असतांना विना नंबर दुचाकीवर अज्ञात दोनजण येऊन  गळ्यातील 50 हजार  रु. कि. चे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून तोडून घेऊन  गेले आहे. या घटनेबाबतच्या सौ. प्राजक्ता सुरेंद्र गाडे ( वय 32, रा. प्लाट नं. 55. समता नगर, सावेडी अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात  गु.र.नं. 120/2022 भादविक 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना चैन स्नैचिंग गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिस पथक आरोपींचा शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली की, कंबर मिर्झा हा त्याचे साथीदारासह चैन स्नैचिंग करुन चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाली. पोनि श्री कटके यांनी त्यासंबंधीची खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
स्थागुशा पथकाने  श्रीरामपूर येथे जाऊन सापळा लावून श्रीरामपूर ते नेवासा जाणारे रोडवर कांदा मार्केट जवळ (ता. श्रीरामपूर) येथे कंबर मिर्झा व त्याचा साथीदारासह मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कंबर रहीम मिर्झा (वय 35, रा. वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर) व साथीदार अनिल रावसाहेब चव्हाण (वय 25, रा. दत्तनगर, स्टेशन रोड, ता. राहुरी) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व बिना नंबर क्टीव्हा मोपेड मिळून आली. आरोपीकडे क्टीव्हा मोपेड गाडीबाबत चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीस समाधानकारक माहिती दिली नाही. त्याला पोलिस खाक्या दाखविताच गाडी ही चंदननगर (जि. पुणे) या परिसरातून चोरी केल्याबाबत सांगितले. त्याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात खात्री करुन अभिलेख पडताळणी करता चंदननगर पोलिस ठाणे येथे गु.र.नं. 142/2017 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी क्टीव्हा मोपेडवर जाऊन समतानगर, सावेडी, अहमदनगर येथील महिलेचे गळयातील सोन्याचे दागिने ओढून चोरले आहे. ते दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.  आरोपी व 1 लाख 70 हजार  रु. किचे सोन्याचे दागिने व क्टीव्हा मोपेड अशा मुद्देमालसह ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस करीत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी  अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, बाळासाहेब मुळीक, पोना विशाल दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ मेघराज कोल्हे, आकाश काळे, राहुल सोळुंके व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment