अनधिकृत ऑनलाइन लोनपासून सावधान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 30, 2022

अनधिकृत ऑनलाइन लोनपासून सावधान.

 अनधिकृत ऑनलाइन लोनपासून सावधान.

सायबर पोलिसांचे आवाहन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः फेसबूक सह सोशल मीडियावर अल्पावधीत लोन देण्याच्या विविध जाहिराती येत असून या जाहिरातीद्वारे फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांनी अशा कोणत्याही अल्पावधीत लोणच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
या फसवणुकी मध्ये मोठया प्रमाणात तरुण वर्ग बळी पडत आहे. फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर अल्पावधीत लोन बाबत विविध जाहिराती येत असतात त्यामध्ये फसवणूक करणार्‍या कडून गुगल प्ले स्टोअर वरून एक अँप डाउनलोड करण्यास सांगतात. ज्यावेळी आपण ते ऍप डाउनलोड करतो त्यानंतर आपल्या कडून आपल्या मोबाईल मधील सर्व माहितीचा एक्सेस घेत असतात *(उदा फोन बुक, फोटो गॅलरी, लोकेशन )* केवळ आधार कार्ड व मोबाईल नंबर वरील जढझ वरून तात्काळ 10000 ते 15000 रु पर्यंत लोन प्राप्त होते. नागरिक घेतलेले लोन फेडतात. परंतु फसवणूक करणारे पुन्हा फोन करून अधिक पैशाची मागणी करतात. शिवीगाळ दमदाटी केली जाते. त्या नंतर सुद्धा पैसे न भरल्यास आपल्या फोन बुक मधील सेव्ह असलेल्या नातेवाईक व मित्र यांना फोन, मेसेज करून लोन घेणार्‍यांची बदनामी केले जाते. या नंतर सुद्धा पैसे न भरल्यास फोटो गॅलरी मधील कुटुंबातील महिलांचे फोटो अश्लील मॉर्फिंग करून फोन मध्ये सेव्ह असलेल्या नातेवाईकांचे नंबर ला पाठवले जातात. किंवा दिल्ली पोलीस मधून बोलतो असे सांगून दमदाटी केली जाते. या सर्व प्रकाराला घाबरून अनेक नागरिक लोन पेक्षा अधिक पैसे भरतात. नागरिकांना आर्थिक फसवणूक तर होतेच परंतु खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सायबर पोलीस स्टेशन, अहमदनगर यांचा कडून आव्हान करण्यात येते की, नागरिकांनी अशा प्रकारे कोणत्याही अल्पवधीतील लोन चा आमिषाला बळी पडू नये. नमूद अल्पवधीतील लोन अधिकृत नसून केवळ नागरिकांना फसवणुकीसाठी याचा वापर केला जातो. असल्याचं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here