ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधवांचे मनपा प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 30, 2022

ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधवांचे मनपा प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन.

 ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधवांचे मनपा प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन.

ख्रिस्ती समाज बांधवांना अंत्यविधीसाठी येणार्‍या अडचणीच्या निषेधार्थ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिका अधिनियमानुसार प्रेताचे दफन व दहनासाठी जागेची तरतूद करणे व त्याची विल्हेवाट लावणे हे महापालिकेचे आद्यकर्तव्य असून, त्यानुसार कारवाई होणे अपेक्षित असताना ख्रिश्चन मयत व्यक्तीच्या दफनाची व्यवस्था महापालिकेने करावी, महापालिकेने येत्या सात दिवसात या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व गंभीरतेने विचार न केल्यास मतय व्यक्तीचे शव महापालिकेत आनण्यात येणार असून, त्याची संपूर्ण व्यवस्था महापालिकेने करावी, नालेगाव येथील मनपाने दिलेल्या जागेत अंत्यविधीला विरोध करणार्यांवर महापालिकेने कायदेशीर कारवाई करावी, नालेगाव येथील सर्वे नंबर 221/1 पैकी दफनभूमीसाठी आरक्षित जागा त्वरित मोजणी करून द्यावी, या जागेचा चहूबाजूंनी स्वरक्षण भिंत बांधून लाईट, पाणी, रस्ते इत्यादी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्या, या भागात असलेली बाभळीची झाडे काढून जागा स्वच्छ करून द्यावी, सिद्धार्थनगर व बुर्हाणनगरच्या दफनभूमीत दफनविधी करण्यासाठी महापालिका स्तरावर शासकीय परवानगी मिळावी. इ. मागणीसाठी अहमदनगर डिस्टिक प्रिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधवांनी काल महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शव पेटी आणून ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून शव पेटी ताब्यात घेतली.
ख्रिस्ती समाजाकडे दफनभूमीसाठी जागा असून अंत्यविधीसाठी परिसरातील नागरिकांचा होणारा विरोध,दफनभूमीत असलेल्या सुविधांचा अभाव व अडचणीच्या निषेधार्थ अहमदनगर डिस्ट्रीक्ट प्रिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील ख्रिस्ती धर्मगुरु व समाजबांधवांनी महापालिकेत काल धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या समाजबांधवांनी जोरदार निदर्शने करीत महापालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये ठिय्या दिला. ख्रिस्ती समाजातील एखादा व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी अनेक अडचणी येत असून, या अडचणी न सोडविल्यास यापुढील अंत्यविधी महापालिकेत करण्याचा इशारा देण्यासाठी आंदोलकांनी शवपेटी देखील आनली होती. पोलीसांनी हस्तक्षेप करुन सदर शवपेटी ताब्यात घेतली.
असोसिएशनचे अध्यक्ष तथा रेव्ह. ताराचंद चक्रनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात रेव्ह. एम.एस. पडागळे, रेव्ह. मदन खंडागळे, रेव्ह. रवी चांदेकर, रेव्ह. हेमराज घोरपडे, रेव्ह. संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजू देठे, ख्रिश्चन एकता मंचचे जिल्हाध्यक्ष संदिप वाघमारे, उपाध्यक्ष श्याम वैरागर, आरपीआयचे विजय शिरसाठ, सुशांत म्हस्के, पवन भिंगारदिवे, दानिश शेख, युवक काँग्रेसचे मयूर पाटोळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, विशाल केदारी, अमृता वाघमारे, अलका गाडे, आकांक्षा क्षीरसागर, सुभाष वाघेला, पास्टर हेमराज घोरपडे, अंजल कांबळे, किरण सकट, सॅम्युवेल वाघमारे, साहिल भिंगारदिवे, किरण पवार आदी ख्रिस्ती समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आंदोलकांनी मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांना घेराव घालून सदर मागण्यांचे निवेदन दिले. डांगे यांनी त्वरीत या प्रश्नावर बुधवारी संध्याकाळी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. रेव्ह. ताराचंद चक्रनारायण यांनी मयत ख्रिस्ती समाजबांधवांच्या अंत्यविधीस अडचण निर्माण झाल्यास त्याचे शव महापालिकेत आनण्याचा इशारा दिला. तर दीप चव्हाण यांनी महापालिकेच्या सभागृहात ठराव झालेला असताना, चुकीचे राजकारण करुन अंत्यविधीसाठी कोणी अडचण निर्माण करत असेल तर, ती गंभीर बाब असल्याचे स्पष्ट केले. या आंदोलनास ख्रिश्चन एकता मंच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
अहमदनगर शहर व आसपासच्या भागांमध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाज अनेक वर्षापासून राहत आहे. शहराच्या विस्तारीकरणामुळे तो आणि ठिकाणी विभागला गेला आहे. विविध उपनगरात व शहरातील भागात स्थलांतरित होऊन वास्तव्य करीत आहे. पूर्वीपासून या समाजासाठी सिद्धार्थनगर व बुर्हाणनगर येथील दोन दफनभूमी अस्तित्वात आहे. या दफनभूमीचा कारभार व मालकी काही विशिष्ट चर्च कडेच आहे. त्यांच्या सभासदत्वाच्या दफनविधी करिता त्या वापरल्या जात आहेत. परंतु नगर शहरामध्ये छोट्या-मोठ्या दोनशेपेक्षा अधिक भक्ती घेणार्या मंडळ व चर्चेस आहेत. त्यांच्या सभासदांचे दफनविधीसाठी दुःखद प्रसंगी परवानगी नाकारली जाते. त्यामुळे बर्याच वेळेस वादविवादाचे भांडणाचे प्रसंग निर्माण होत आहे. प्रसंगी मृतदेहाची विटंबना होत आहे. अशाप्रसंगी दुःखात असलेल्या कुटुंबाला अंत्यविधी करायचा कुठे? असा मोठा प्रश्न निर्माण झालेला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ख्रिस्ती समाजासाठी महानगरपालिकेच्या वतीने नालेगाव येथील सर्वे नंबर 221/1 पैकी आरक्षण क्रमांक 296 दफनभूमी करिता एक हेक्टर वीस आर जागा ख्रिश्चन समाज दफन भूमीकरिता मनपा ठराव क्रमांक 60 नुसार 25 ऑक्टोबर 2010 रोजी देण्यात आली आहे. परंतु सदर जागेची मोजणी झालेली नाही. या जागेवर वेडीबाभळीची झाडे मोठ्या संख्येने वाढलेली आहे. तसेच सदर जागेत दफन विधी करण्यास स्थानिक नागरिक विनाकारण विरोध करत आहे. ही बाब अतिशय संवेदनशील व ख्रिस्ती बांधवांची भावना दुखावणारी आहे. दफनभूमीत अत्यविधीस विरोध करणार्यांवर महापालिकेने गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment