चांदा दरोडा व खून प्रकरणातील आरोपी बाबाखान गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 7, 2022

चांदा दरोडा व खून प्रकरणातील आरोपी बाबाखान गजाआड.

 चांदा दरोडा व खून प्रकरणातील आरोपी बाबाखान गजाआड.

खून, दरोडा, जबरी चोरीच्या 4 गुन्ह्यात फरार असणारा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चांदा येथील कर्डिलेवस्तीवर दरोडा टाकून ओंकार गंगाधर कर्डिले यांची हत्या करणारा व महिलांच्या अंगावरून जबरदस्तीने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणारा आरोपी बाबाखान शिवाजी भोसले (वय 45) रा.गोंडेगाव ता.नेवासा यास कर्जत तालुक्यातील कुळधरण रोडवर वीटभट्टी वरून स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. आरोपी नामे बाबाखान शिवाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस दरोडा, जबरी चोरी, स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणुक घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे 08 गुन्हे दाखल आहेत. आरोपीस ताब्यात घेवून सोनई पोलीस पुढील कारवाई सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. प्रस्तुत बातमीची हकिगत अशी को, दिनांक 02 मार्च 2022 रोजी फिर्यादी नवनाथ ज्ञानदेव कर्डीले, वय 26, रा. लोहारवाडी रोड, कर्डीलेवस्ती, चांदा, ता. नेवासा यांनी मी, माझा चुलत भाऊ गंगाधर व बापु असे रात्री जेवण करुन घरा बाहेर झोपलेले असतांना अज्ञात इसमांनी वस्तीवर येवून जबर दुखापत केली. तसेच ओंकार गंगाधर कर्डीले यास मानेवर, जबड्याजवळ सुर्‍याने जबर दुखापत करून जिवे ठार मारले व चुलती अर्चना कर्डीले हिचे गळ्यातील 15,000/- रु. मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेवून गेले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी सोनई पोलीस गुरनं 73/2022 भादविक 302, 394 397 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा. मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणी भेट देवून पोनि/ श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अ.नगर यांना गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पोनि श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वंतत्र पथकाची नेमणूक करून वर नमुद गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेथुन कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले.
नमुद सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतोल सपोनि /सोमनाथ दिवटे, पोसई सोपान गोरे, पोहेको सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, संदीप पवार, संदीप घोडके, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी ज्ञानेश्वर शिंदे, रवि सोनटक्के, संदीप दरर्दले, संतोष लोडे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, पोको सागर ससाणे, शिवानी ढाकणे, मथुर गायकवाड, विनोद मासाळकर, रणजीत जाधव, मच्छिद्र बडे, विजय धनेधर, योगेश सातपुते, चापोहको उमाकांत गावडे, संभाजी कोलकर, अर्जुन बडे व चापांना भरत बुधवंत असे मिळून पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असताना पोनि/ श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे बाबखान शिवाजी भोसले हा कुळधरण रोड, ता. कर्जत येथे विटभट्टीवर काम करत आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने, पोनि/ श्री. कटके यांनी मिळालेल्या बातमीतील आरोपीची खात्री करून कारवाई करणे त सूचना दिल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून कुळधरण, ता. कर्जत येथे जावून आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव बाबाखान शिवाजी भोसले वय 45, रा. गोंडेगांव, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चोकशी केली असता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी नामे बाबा खान शिवाजी भोसले यास अधिक विश्वासात घेवून अहमदनगर जिल्ह्यात आणखी कोण-कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत. या बाबत चौकशी करता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली असून मोक्का, दरोडा व जबरी चोरी अशा एकुण 04 गुन्ह्यात फरार आहे.
ही कारवाई मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलीस अधीकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment